दीपिका पदुकोणच्या बहुप्रतिक्षित ‘Gehraiyaan’ सिनेमाचे टायटल साँग रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'गेहराईयाँ' हा बहुप्रतिक्षित सिनेमाचे 20 जानेवारीला ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद येत असतानाच गेहराईयाँ या सिनेमाचं टायटल सॉंग रिलीज झालं आहे. या गाण्यालाही चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. गाणं रिलीज होताच अवघ्या दीड तासात दीड मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Release of the title song of Deepika Padukone's much awaited movie 'Gehraiyaan'
दीपिका पदुकोणच्या बहुप्रतिक्षित 'Gehraiyaan' सिनेमाचे टायटल सॉंग रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘गेहराईयाँ’ हा बहुप्रतिक्षित सिनेमाचे 20 जानेवारीला ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद येत असतानाच गेहराईयाँ या सिनेमाचं टायटल सॉंग रिलीज झालं आहे. या गाण्यालाही चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. गाणं रिलीज होताच अवघ्या दीड तासात दीड मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा सिनेमा येत्या 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून, दीपिकाचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळतं आहे.

या सिनेमाचे टायटल सॉंग गीतकार अंकुर तिवारी यांनी लिहिलं आहे. तर या गाण्याला ओफ (OAFF) आणि सवेरा यांचं संगीत लाभलं आहे. याशिवाय गायिका लोथिकाने हे गाणे सुरबद्ध केले आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिध्दांत चतुर्वेदी,धैर्य करवा हे कलाकार मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहेत. याशिवाय नसिरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भुमिका पाहायला मिळत आहेत. हा दिपिकाचा ओटीटीवरचा पहिला सिनेमा Amazon Prime वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण एका फिटनेस ट्रेनरच्या भूमिकेत दिसणार आहे.ही फिल्म एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित असून, दीपिका आणि अनन्या बहिणीच्या कॅरेक्टरच्या रिलेशनशिपला गुंतागुंतीची करेल.या चित्रपटात अनेक इंटीमेट सीन्ससुद्धा असून, जे सेस्नॉर बोर्डला पटणारे नसून, हा चित्रपट वादाच्या कचाट्यात सापडू शकतो.मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतकी बंधने नसतात.


हे ही वाचा – Budget 2022 memes : अर्थसंकल्प झाला सादर अन् जनता बोलते, क्या करु मै मर जाऊं…