Remo Dsouzaच्या मेहुण्याची आत्महत्या, बहिण लिजेलने सांगितलं कारण म्हणाली…

जेनसने आत्महत्या केली तेव्हा रेमो आणि लिजेल डिसूझा एका जवळच्या मित्राच्या लग्नासाठी गोव्यात गेले होते. तेव्हा लिजेलला तिच्या वडिलांचा फोन आला. फोनवर ते खूप शांत झाले. त्यांनी जेनस कुठे आहे असे लिजेलला विचारले. त्यांच्या अशा बोलण्यावरुन आधी रेमो आणि लिजेलला काहीही समजले नाही.

Remo Dsouza brother in law jason watkins commits suicide in mumbai
Remo Dsouzaच्या मेहुण्याची आत्महत्या, बहिण लिजेलने सांगितलं कारण म्हणाली...

प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा ( Remo Dsouza)  मेहुणा जेसन वातकिन्सने (jason watkins ) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जेसनच्या आत्महत्येनंतर रेमोची पत्नी लिजेलाला (Liezel Dsouza) मोठा धक्का बसला असून ती पूर्णपणे कोलमडून गेलीआहे. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून मृतदेह पोस्टमर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस चौकशीसाठी लिजेल पोलीस ठाण्यात दाखल झाली असून भावाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण सांगितले.

रेमो डिसूझाच्या परिवारासाठी 20 जानेवारीचा दिवस फार वाईट ठरला. भावाच्या जाण्याने लिजेल डिसूझा फार शॉकमध्ये होती. टाइम्स ऑफ इंडियाची बोलताना लिजेल म्हणाली, माझे वडील डायलेसिस रुग्ण आहेत. ते रुग्णालयात गेले होते परत आल्यानंतर ते मुलाला शोधत होते. त्याच्या बेडरुममध्ये गेल्यावर मुलगा मृत अवस्थेत होता.

लिजेल डिसूझाची बहिण पुढे म्हणाली, 2018मध्ये माझ्या आईचे निधन झाले. तेव्हापासून जेसन डिप्रेशनमध्ये होता. आईचे छत्र हरवल्याने तो पार कोलमडून गेला होता. आईसोबत त्याचे फार जवळचे नाते होते. आईसाठी त्याने लग्न देखील केले नाही. आई गेल्यानंतर वडील आणि जेनस दोघेच राहत होते.

 

जेनसने आत्महत्या केली तेव्हा रेमो आणि लिजेल डिसूझा एका जवळच्या मित्राच्या लग्नासाठी गोव्यात गेले होते. तेव्हा लिजेलला तिच्या वडिलांचा फोन आला. फोनवर ते खूप शांत झाले. त्यांनी जेनस कुठे आहे असे लिजेलला विचारले. त्यांच्या अशा बोलण्यावरुन आधी रेमो आणि लिजेलला काहीही समजले नाही. मात्र त्यांनी त्यांना काही विचारण्याआधीच सगळे संपले होते.

लिजेलने भावाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. जेनसचा फोटो शेअर करत लिजेलने लिहिलेय, ‘का? तु माझी साथ कसा काय सोडू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही’. लिजेलने जेनस आणि तिच्या आईचा फोटो पोस्ट करत ‘आई मला माफ कर’, असे म्हटले आहे. तर लिजेल आणि जेनस यांचा लहानपणीचा फोटो देखील तिने पोस्ट केला आहे.


हेही वाचा – Shaheer Sheikh: पवित्र रिश्ता फेम अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोरोनाने निधन