घरमनोरंजनहार्ट अटॅक नंतर रेमो डिसूजाचा पहिला व्हिडिओ व्हायरल

हार्ट अटॅक नंतर रेमो डिसूजाचा पहिला व्हिडिओ व्हायरल

Subscribe

डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर रेमोला आयसीयूमधील बाहेर काढण्यात आले आहे. रेमोच्या बायकोने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात रेमो एका गाण्यावर आपल्या पायाचे टॅपिंग करताना दिसत आहे.

प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डीसूजाला दोन दिवसापूर्वी ह्यदयविकाराचा झटका आल्याने त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांसाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ह्रदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यानंतर रेमोने त्याचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला त्याच्या निरोगी जिवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रेमोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रेमोच्या बायकोने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Liz (@lizelleremodsouza)


रेमो डिसूजाला उपचारांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर रेमोला आयसीयूमधील बाहेर काढण्यात आले आहे. रेमोच्या बायकोने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात रेमो एका गाण्यावर आपल्या पायाचे टॅपिंग करताना दिसत आहे. रेमोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘पायांनी नृत्य करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि अंत:करणाने नृत्य करणे ही एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी केलेली प्रार्थना आणि तुमचे आशिर्वाद यासाठी सर्वाचे आभार’, असे म्हणून रेमोने त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

रेमो डिसूजाला ह्यदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याची बायको लिजेल हिने सांगितले होते की, रेमो ह्रदयरोगाचा झटका येणे ही आमच्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट होती. त्याला कधीच ब्लड प्रेशर सारख्या समस्या नव्हत्या. त्याला कोणत्याही प्रकारचा ताण तणावही नव्हता, असे त्यांच्या बायकोने सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्येही रेमोचे नृत्याप्रति असलेले प्रेम दिसून येते आहे. रूग्णालयाच्या कपड्यातील रेमोचा हा व्हिडिओ आहे. रूग्णालयात एका गाण्यावर त्याचे पाय ठेका धरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – ‘आश्रम’ पुन्हा वादच्या भोवऱ्यात, बाबा निरालासह निर्मात्याला कोर्टाची नोटीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -