घरताज्या घडामोडीबॉलिवूडचा लोकप्रिय कोरियोग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका!

बॉलिवूडचा लोकप्रिय कोरियोग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका!

Subscribe

बॉलिवूडला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय कोरियोग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात रेमो डिसूझाला दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आला. सध्या रेमोची पत्नी लिज डिसूझा रेमोसोबत रुग्णालयात आहे. रेमोची अँजिओग्राफी झाली असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रेमो डिसूझा हा बॉलिवूडचा लोकप्रिया डान्स कोरियोग्राफर आहे. १९९५ साली रेमोने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केला. ज्यानंतर रेमोने २००० मध्ये ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटात कोरियोग्राफी केली. यानंतर रेमोने आतापर्यंत अनेक चित्रपटात जबरदस्त डान्स कोरियोग्राफी केली आहे. रेमोला ‘तहजीब’, ‘स्टूडंट ऑफ द ईअर’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘एबीसीडी २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘कलंक’ या चित्रपटांसाठी बेस्ट डान्सर अवॉर्ड दिले गेले आहेत.

- Advertisement -

काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये रेमोने दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकले. ‘रेमोने फ्लाइंग जट’, ‘रेस ३’, ‘फालतू’, ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’, ‘स्ट्रीट डान्सर’सारख्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याव्यतिरिक्त रेमो अनेक रियालिटी शोमध्ये देखील दिसला आहे. रेमोने डान्स इंडिया डान्सचे अनेक सीझनला जज केले आहे. इंडस्ट्रीत रेमोने पहिल्यापासून आपली जागा बनवली होती, परंतु या शोमुळे रेमो लोकांपर्यंत जास्त पोहोचला. ‘डान्स इंडिया डान्स’ व्यतिरिक्त ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिए’ आणि ‘डान्स प्लस’सारखे डान्स रियलिटी शोमध्ये रेमो दिसला आहे.


हेही वाचा – कोरोनायोद्धा अभिनेत्री शिखा मल्होत्राला लकव्याचा झटका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -