घरमनोरंजनतान्हाजी ट्रेलर लॉन्चला सैफला विचारलं तैमुरबद्दल आणि....

तान्हाजी ट्रेलर लॉन्चला सैफला विचारलं तैमुरबद्दल आणि….

Subscribe

नुकताच ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी सैफ जेव्हा मंचावर आला तेव्हा एक मजेदार प्रश्न त्याला विचारण्यात आला आणि एकच हशा पिकला.
मुंबईमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना कलाकारांनी उत्तर दिली. सैफ मंचावर आल्यावर पुढच्या क्षणी पत्रकारांच्या गर्दीमधून त्याला पहिलाच प्रश्न तैमुरबद्दल विचारण्यात आला. या प्रश्नाला सैफनेही हसत हसतच उत्तर दिले. ‘सर तैमुर कैसा हैं?’ असा प्रश्न सैफ मंचावर आल्यावर एका पत्रकाराने विचारला आणि सगळेच हसायला लागले.

 

- Advertisement -

सैफने लगेच या प्रश्नाला उत्तर देताना, ‘तैमुर ठीक है’ असं उत्तर दिलं. सैफचे उत्तर ऐकून मंचावर उपस्थित असणाऱ्या अजय देवगण आणि रोहित शेट्टी सगळ्यांनाच हसू आवरले नाही.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात महाराजांइतकेच त्यांच्या मावळ्यांचे पराक्रम आजही सांगितले जातात. याच शिवकालीन इतिहासात महाराजांचा एका मावळ्याचा पराक्रम सर्वश्रृत आहे. तान्हाजी मालूसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा बॉलिवूडमध्ये अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -