भारत यंदा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी सर्वत्र रोषणाई असते. भारतातील प्रत्येक नागरिक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो. या दिवशी मुले शाळा-महाविद्यालयांमध्ये तिरंग्याप्रती देशाप्रती आदरभाव व्यक्त केला जातो. सर्वजण देशभक्तीच्या भावनेने भरून जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ऑफिसेस आणि शाळा, कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी आपला लूक स्पेशल आणि कार्यक्रमाला साजेसा दिसावा यासाठी अनेक महिलांचे प्रयत्न सुरू असतात. कोणत्या प्रकारचे ड्रेसेस किंवा साड्या स्टाईल कराव्यात याबद्दल महिलांच्या मनात संभ्रम असतो. जर तुम्हालाही या दिवशी वेगळे दिसायचे असेल तर तुम्ही या 26 जानेवारीला काही बॉलीवूड अभिनेत्रींच्या लूक्सकडून आयडियाज घेऊ शकता.
उर्वशीचा तिरंगा लूक :

उर्वशी रौतेला सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. उर्वशी तिच्या फॅशन सेन्सला खूप महत्त्व देते आणि तिच्या लूकने चाहत्यांना नेहमीच आकर्षित करत असते. या प्रजासत्ताक दिनी तुम्ही उर्वशीचा हा तिरंगा लुक रिक्रिएट करू शकता. तुम्ही पांढऱ्या आणि केशरी रंगाची मिक्स्ड कुर्ती हिरव्या पँटसोबत परिधान करू शकता आणि तिरंगा बॉर्डर असलेला दुपट्टा यावर कॅरी करू शकता. यामुळे तुम्हाला अॅट्रॅक्टिव्ह लूक मिळू शकेल.
जान्हवीचा साधा आणि सोबर लूक:

जान्हवी कपूरचा हा लूक अगदी साधा आणि मोहक आहे. जर तुम्हालाही कोणत्याही फ्रिल्सशिवाय नॉर्मल लूक कॅरी करायचा असेल, तर तुम्ही जान्हवीच्या या लूकमधून आयडिया घेऊ शकता. जान्हवीने पांढऱ्या प्रिंटेड कॉटन कुर्त्यासोबत स्ट्राईुप्स असलेला पायजमा मॅच केला आहे. यासोबत तिने हलक्या रंगाचा हिरवा दुपट्टाही कॅरी केला आहे.
शोभिताची हँडलूम साडी :

शोभिता धूलिपाला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी देखील खूप चर्चेत असते. अलीकडेच नागा चैतन्यसोबतच्या लग्नसोहळ्यातील तिचा प्रत्येक लूक व्हायरल झाला होता. त्यापैकीच एक असलेला तिचा हा लूक तुम्ही २६ जानेवारीलाही कॅरी करू शकता. जर तुम्हाला हातमागाच्या साड्या नेसण्याची आवड असेल, तर तुम्ही अभिनेत्रीसारखी आयव्हरी, हिरवी आणि केशरी रंगाची साडी नेसू शकता.
साराचा शरारा लूक :

तुम्ही प्रजासत्ताक दिनी सारा अली खानचा शरारा लुक देखील कॅरी करू शकता. साराप्रमाणेच तुम्ही पांढऱ्या सूटसोबत तिरंग्याचा दुपट्टा कॅरी करू शकता. हा लूक तुम्हाला गर्दीतही वेगळं दाखवू शकेल.
हेही वाचा : Wart Removal Tips : चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
Edited By – Tanvi Gundaye