HomeमनोरंजनRepublic Day 2025: 26 जानेवारीला आवर्जून पहा बॉलिवूडचे हे देशभक्तीपर सिनेमे

Republic Day 2025: 26 जानेवारीला आवर्जून पहा बॉलिवूडचे हे देशभक्तीपर सिनेमे

Subscribe

आजची पिढी उद्याचा भारत घडवणारी आहे आणि त्यामुळे मुलांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रेम तसेच आदराची भावना कायम असणे गरजेचे आहे. याकरता मुलांना घरच्या घरी देशभक्तीपर सिनेमे दाखवणे हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया घरबसल्या ओटीटीवर पाहता येतील असे कोणकोणते देशभक्तीपर सिनेमे उपलब्ध आहेत. जे मुलांच्या मनात देशभक्ती रुजवण्यास सहकार्य करतील.

उद्या दिनांक 26 जानेवारी अर्थात आपल्या देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. भारतातील प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. कारण, याच दिवशी देशाला संविधान प्राप्त झाले. त्यामुळे देशभरात ठिकठिकाणी देशभक्तीपर सोहळे आयोजित केले जातात. शाळा- कॉलेजमध्ये झेंडावंदन आणि विविध कार्यक्रम आखले जातात. एकंदरच काय तर प्रत्येक भारतीय आपापल्या परीने प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना तसेच शालेय संस्थांना सुट्टी असते. (Republic Day 2025 watch these patriotic cinemas on ott)

आजची पिढी उद्याचा भारत घडवणारी आहे आणि त्यामुळे मुलांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रेम तसेच आदराची भावना कायम असणे गरजेचे आहे. याकरता मुलांना घरच्या घरी देशभक्तीपर सिनेमे दाखवणे हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया घरबसल्या ओटीटीवर पाहता येतील असे कोणकोणते देशभक्तीपर सिनेमे उपलब्ध आहेत. जे मुलांच्या मनात देशभक्ती रुजवण्यास सहकार्य करतील.

1. बॉर्डर

बॉलिवूड सिनेवर्ल्डमधील ‘बॉर्डर’ हा सिनेमा 1997 साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा 1971 च्या भारत- पाक युद्धातील निर्णायक लोंगेवालाच्या लढाईवर आधारित आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बॉर्डरवर जीवाची बाजी लावून लढणाऱ्या जवानांची शौर्यगाथा दाखवली आहे. जेपी दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ या सिनेमात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना आणि पूजा भट्ट हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हा सिनेमा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

2. लगान

आमिर खान प्रॉडक्शन निर्मित आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा सिनेमा 2001 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या जमिनी करमुक्त करण्यासाठी खेळला गेलेला क्रिकेटचा सामना आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा सिनेमा म्हणजे एक स्पोर्ट्स ड्रामा असून तो पाहताना अगदी इंडिया- पाकिस्तान मॅच सुरु असल्याचा फील येतो. या सिनेमात आमिर खान, ग्रेसी सिंग आणि पॉल ब्लॅकथ्रोन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म Zee 5 वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

3. रंग दे बसंती

2006 साली प्रदर्शित झालेल्या ‘रंग दे बसंती’ या सिनेमाचे कथानक काही मित्रांभोवती फिरणारे आहे. दोस्तीच्या दुनियादारीत मशगुल असणारे हे मित्र राजकारण आणि भ्रष्टाचारासमोर आपली देशभक्ती सिद्ध करताना दिसतात. अत्यंत रंजक असा हा सिनेमा राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश अभिनेत्री ॲलिस पॅटन हे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

4. राझी

राझी हा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला होता. मेघना गुलजार दिग्दर्शित आणि जंगली पिक्चर्स व धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा स्पाय थ्रिलर सिनेमा बनवण्यात आला होता. विनीत जैन, करण जोहर, हिरू यश जोहर आणि अपूर्व मेहता निर्मित या सिनेमात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. आपल्या देशासाठी मरण पत्करण्याची तयारी असणाऱ्या स्पायची ही गोष्ट आहे. या सिनेमात आलियासोबत विकी कौशल, रजित कपूर, शिशिर शर्मा आणि जयदीप अहलावतदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

5. उरी: द सर्जिकल स्ट्राइक

‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य धरने केले आहे. या सिनेमाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. 2016 मध्ये उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून केलेल्या प्रतिहल्ल्याची कथा या सिनेमातून आपल्याला पहायला मिळते. या सिनेमात विकी कौशल आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म Zee 5 वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

6. सॅम बहादूर

सॅम बहादुर हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक चरित्रपट आहे. जो भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. यात अभिनेता विकी कौशलने माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म Zee 5 वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

हेही पहा –

Sayali Sanjeev : सायली संजीवने घेतला सद्गुरुंच्या आश्रमातील अद्भुत अनुभव, पहा फोटो