घरमनोरंजननेहा धुपियाचा फोन अंगद बेदी लपून चेक करत असल्याचा केला खुलासा म्हणाला....

नेहा धुपियाचा फोन अंगद बेदी लपून चेक करत असल्याचा केला खुलासा म्हणाला….

Subscribe

'नेवर हॅव आय एवर' या खेळा अंतर्गत एकमेकांना अनेक मजेशीर प्रश्न विचारले. सध्या या सेगमेंट मधल्या एका प्रश्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे.

अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांनी 3 वर्षापूर्वी 10 मे रोजी लग्नगाठ बांधली होती. नेहा आणि अंगदच्या लग्नाची बातमी ऐकून अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. लग्नाच्या 6 महिन्यानंतर  नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.नुकतच दोघांच्याही लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि गेल्या वर्षी प्रमाणे या दिवसाचे सेलिब्रेशन नेहा आणि अंगदने एक मजेशीर खेळ खेळून केलं आहे. दोघांनी ‘नेवर हॅव आय एवर’ या खेळा अंतर्गत एकमेकांना अनेक मजेशीर प्रश्न विचारले. सध्या या सेगमेंट मधल्या एका प्रश्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे. नेहाने अंगदला विचारले ‘कधी तू माझा फोन चेक केला आहेस का?’ या प्रश्नाचे उत्तर देत अंगद म्हणाला, ”मी अनेकदा तुझा फोन चेक केला आहे. माला या पासून काहीच आपत्ती नाही. मी फक्त तुझा फोन अशा करिता चेक करतो की तू तुझ्या सासुच्या मेसेजला रीप्लाय देतेस की नाही आणि काय रीप्लाय देतेस” अशा मजेशीर अंदाजात दोघांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

- Advertisement -

नेहा आणि अंगदच्या लग्नाला आज 3 वर्ष पूर्ण होत आहे. एका मुलाखती दरम्यान अंगदने जेव्हा नेहा बद्दल पहिल्यांदा घरच्यांना सगीतले होते त्या वेळचा किस्सा शेअर केला आहे. “‘जेव्हा मी नेहाच्या आई-वडिलांना सांगितले की ती गरोदर आहे, तेव्हा क्षणभर वातावरण पूर्णपणे शांत झाले होते. आणि मग त्यांना खूप राग आला. माला ओरडाही खवा लागला. नेहाचे घरचे यासाठी तयार होतील असं मला वाटत नव्हतं. कारण हे ऐकून नेहाच्या आईला खूपच धक्का बसला.पण नंतर सर्व काही ठीक झाले.


हे हि वाचा – CoronaVaccination:बॉलिवूड कलाकारांनी घेतला कोरोना लसीकरणाचा पहिला डोस

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -