घरमनोरंजनसंथ पण प्रभावी 'शेरनी'!

संथ पण प्रभावी ‘शेरनी’!

Subscribe

ह्युमन कम्प्युटर शकुंतला देवी यांच्या बायोपिकमधील हसरी-खेळती, चुलबुली विद्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शेरनी'मध्ये मात्र एकदम विरूद्ध भासली.

एकीकडे बॉलीवूडचे दिग्गज कलाकार आपले बिग बजेट चित्रपट ओटीट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार देत असतानाच अभिनेत्री विद्या बालन हिचे दोन चित्रपट या कोरोना काळात प्रेक्षकांच्या भेटीला आले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘शकुंतला देवी’ आणि यंदाचा ‘शेरनी’. या दोन्ही चित्रपटांनी ओटीटीवर प्रदर्शित होत असतानादेखील प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. त्याचे श्रेय नक्कीच अष्टपैलू अभिनेत्री विद्या बालन हिला जाते. ह्युमन कम्प्युटर शकुंतला देवी यांच्या बायोपिकमधील हसरी-खेळती, चुलबुली विद्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरनी’मध्ये मात्र एकदम विरूद्ध भासली. शांत, संयमी, संवादापेक्षाही नजरेतून, चेहऱ्यावरील हावभावातून व्यक्त होणारी विद्या प्रेक्षकांनी ‘शेरनी’मध्ये पाहिली. एक उत्तम कलाकार कोणत्याही भूमिकेत अगदी चपखल बसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा विद्याची ‘शेरनी’ पाहिल्यावर येतो.

- Advertisement -

‘शेरनी’ हा चित्रपट १८ जून रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून नेटकऱ्यांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जंगलातील वाघ, वन्य प्राणी, त्याच्या आजूबाजूच्या वस्तीतील जनजीवन आणि वन अधिकारी यांच्या अवतीभवती फिरणारी ‘शेरनी’ची पटकथा आहे. विद्या बालन हिने चित्रपटात विद्या विंकेट या वन अधिकारीची भूमिका साकारली असून तिच्या सोबत निरज काबी, विजय राज, बिजेंद्र काला, शरत सक्सेना सारखे तगडे कलाकार आहेत. शिवाय शेरनी चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी केले आहे. यापूर्वी अमित मसूरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘न्युटन’ चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. ‘न्युटन’ चित्रपटाला ऑस्करचे नामांकनही मिळाले होते. त्यामुळे अमित मसूरकर यांचा पुढील चित्रपट कोणता असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा ‘शेरनी’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्यातून व्हर्सटाईल अभिनेत्री विद्या बालन हिच्या अभिनयाचा वेगळाच पैलू तिच्या चाहत्यांनी पाहिला.

जंगलातील वाघिण आपल्या पिल्लांचे रक्षण करत गाव-वस्तीतून वाट शोधत पुन्हा जंगलाच्या दिशेने निघते. मात्र गावातील पुढाऱ्यांच्या राजकारणात आणि काही भ्रष्ट वन्य अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे तिल्या वाटेत अनेक अडचणी निर्माण होता. टी २० असे या वाघिणीचे नाव आहे. खरंतर ही वाघिण चित्रपटच्या केंद्रस्थानी दाखवली असून तिला वाचवण्यासाठी विद्याने केलेली धडपड, तिची अगतिकता आखाळण्याजोगी आहे. अतिशय शांत, संथ वेळप्रसंगी कंटाळवाणा वाटणारा शेरनी कलाकारांच्या उत्तम अभिनयासाठी शिवाय जंगलातील वन्य प्राण्यांचे विश्व कसे असते हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांनी एकदा पाहायला हरकत नाही. विद्या बालनचा शकुंतला देवी हा चित्रपट ओटीटीवर सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या चित्रपटांपैकी दुसऱ्या स्थानांवर आहे. शेरनी हा लोकप्रियतेच्या स्पर्धेत उतरत नसला तरी कलाकृतीचा उत्तम नमूना, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शिकाचे व्हाईल्ड व्हिजन यासाठी शेरनी चित्रपट पाहालया हरकत नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

ईडीकडून अविनाश भोसलेंची ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -