बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत असून गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या जवळच्या व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची देखील याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, रियाने आपल्या Whatsappचा डीपी बदलला असून रियाने सुशांतसोबतचा डीपी ठेवला आहे. तसेच तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत मेसेज देखील लिहिला आहे. त्यात ती म्हणाली आहे की, ‘मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन’, अशी भावनिक पोस्ट तिने टाकली आहे.
काय म्हणाली रिया चक्रवर्ती?
‘अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. पण, मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करणार आहे’. असे म्हणत कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतशी निगडीत आठवणींना उजाळा देत पोस्ट केली आहे.
रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी आताही माझ्या भावनांचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. तूच तो व्यक्ती आहेस, ज्याने मला प्रेमात विश्वास दिला आणि प्रेमाची जाणिव करून दिली. सुशांत तूच मला शिकवले आहेस की, एखादे सोप समीकरण जीवनाचा अर्थ शिकवू शकते. त्यामुळे सुशांत मी तुला वचन देते की, मी तुझ्याकडून प्रत्येक दिवस शिकली आहे. तसेच मला माहिती आहे की, तू आता सध्या अत्यंत शांतिपूर्ण जागेवर आहेस. तू स्वतः एक तारा बनला आहेस. मी आता त्या तुटणाऱ्या ताऱ्याची वाट पाहणार, आणि हे मागणार की, तू माझ्याकडे पुन्हा यावे. त्याचप्रमाणे मी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे आणि तू सुद्धा हेच सांगायचास की, आपलं प्रेम वेगळं आहे. सुशी, तुला गमावून आज ३० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन.’
हेही वाचा –Corona in Bollywood: रेखा यांच्यानंतर दिग्दर्शिका झोया अख्तर यांचाही बंगला सील