Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन रियाने ठरली बॉलिवूडची सर्वात प्रभावी अभिनेत्री, दीपिका-कतरिनाला टाकलं मागे

रियाने ठरली बॉलिवूडची सर्वात प्रभावी अभिनेत्री, दीपिका-कतरिनाला टाकलं मागे

यादीत कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, दिशा पटानी यांसारख्या अनेक तगड्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींना मागे सोडत रियानं पहिला क्रमांकवर बाजी मारली आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंगच्या निधनाने बॉलिवूडचं नाही तर संपूर्ण देश हादरले होते. यानंतर अनेक माध्यमांवर तसेच सोशल मीडियावर सुशांतच्या निधनाचे अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावले गेले. या केस मध्ये सुशांतची पूर्व प्रेयसी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. तसेच ड्रग्स प्रकरणात सुद्धा रियाला अटक करण्यात आली होती. इतकचं नाही तर संतापलेल्या लोकांनी तर तिच्या घराबाहेर उभं राहून घोषणाबाजी देखील केली होती.सर्व स्तरावरून टीकेची झोड उठल्या नंतर देखील रिया चक्रवर्ती बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री ठरली आहे. (Most Desirable Women 2020) टाईम्सनं नुकतचं  सर्वात प्रभावी अभिनेत्रींची यादी जाहिर केली त्यामध्ये रिया पहिल्या स्थानावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

- Advertisement -

दरवर्षी प्रमाणे यंदाही द टाइम्सकडून 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 ची यादी समोर आली आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींचा यात समावेश करण्यात आला होता. ऑनलाईन वोटिंग झाल्यानंतर टाईम्सने ही यादी सर्वांसमोर आणली आहे. या यादीत कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, दिशा पटानी यांसारख्या अनेक तगड्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींना मागे सोडत रियानं पहिला क्रमांकवर बाजी मारली आहे.


हे हि वाचा – लाओ मेरी चप्पल…यामी गौतमची खिल्ली उडवल्याने विक्रांत मेस्सीला कंगणाने झाडले

- Advertisement -