ड्रग्ज प्रकरणात रियाने घेतली बॉलिवूडच्या ‘या’ २५ सेलिब्रिटींची नावं; NCB करणार चौकशी!

रियाने ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत त्यांना एनसीबी समन्स पाठवणार

रिया चक्रवर्तीने एनसीबी समोर ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची नावं घेतल्याचे उघड झाले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह ६ लोकांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एनसीबीच्या रडारवर आता अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा ही नावं आहेत, कारण ही नावं रियानं घेतली असल्याची माहिती आहे. दरम्यान शौविक आणि रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून देखील याबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाने बॉलिवूड मधील काही नव्या कलाकारांसह एकूण २५ जणांची नावे घेतली आहेत. ज्यांची चौकशीसाठी एनसीबी करण्याच्या तयारीत आहे. हे सेलिब्रिटी ड्रग्ज घेत असल्याची माहिती रियाने NCB ला दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रियाने ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत त्यांना एनसीबी समन्स पाठवणार आहे. या लिस्टमध्ये बॉलिवूडचे अनेक ए ग्रेड सेलिब्रिटी आहेत. ज्यात अॅक्टर्स, डायरेक्टर्स, कास्टिंग डायरेक्टर्स, प्रोडक्शन हाउससह अन्य लोकांचा समावेश आहे. माहितीनुसार सारा अली खानचं नाव थायलंडच्या एका टूरमध्ये समोर आले होते. ती सुशांतसोबत तिकडे गेली होती. तर डिझायनर सिमोन खंबाटाचे नाव रियाच्या व्हॉट्सएप चॅटमधून ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. तर रियाने या एनसीबी चौकशीदरम्यान रकुलप्रीतचे नाव घेतलं होतं.

दरम्यान याच माहितीच्या आधारे ड्रग्ज अँगलचा तपास मोठ्या वेगात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, NCB च्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने ही छापेमारी केली आहे.

तर शौविकने ड्रग्जसाठी रिया कधी कधी आपल्या अकाउंट मधून पैसे देत असल्याची कबुली दिली तर सॅम्युअलने सुद्धा या माहितीला दुजोरा देत रियाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सॅम्युअल आणि शौविक दोघांनीही रिया ही सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबूली दिली आहे. तसंच दोघांनी सुशांतच्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर व्हायचा आणि कोण कोण त्याचं सेवन करायचे याचीही माहिती दिली आहे.


रियाच्या अटकेनंतर मुंबई आणि गोव्यात NCB ची ५ ठिकाणी रेड