तुझी रोज आठवण येते, सुशांतसाठी रियाची खास पोस्ट

सुशांतच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनीही त्याचे चाहते त्याची आठवण काढत असतात. सुशांतच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने पोस्ट केली आहे.

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या मृत्यूचा रोख त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यावर आला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनीही त्याचे चाहते त्याची आठवण काढत असतात.
सुशांतच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने पोस्ट केली आहे. (Rhea Chakraborty On Sushant Singh Rajput Death Anniversary Shares Unseen Pictures)

हेही वाचा – दीपिका पदुकोणच्या तब्येतीत सुधारणा, चित्रिकरणादरम्यान वाढले होते हृदयाचे ठोके

सुरुवातीपासूनच सुशांतसिंहचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेलं होतं. सुशांतची पहिली मालिका पवित्रा रिश्ता दरम्यान त्यांचं अफेअर अंकिता लोखंडेसोबत सुरू होतं. ते दोघे लग्नही करणार होते. मात्र, त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर सुशांतसिंह क्रिती सेननमध्ये तो गुंतला. या दोघांच्या अफेर्सचीही बरीच चर्चा रंगली. मात्र, त्यांचंही नंतर ब्रेकअप झालं. दरम्यान, तो नैराश्येत गेला. बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळे त्याला कामं मिळणं कमी झाले. त्यामुळे तो नैराश्येत गेला असल्याचं समोर आलं होतं. त्याच काळात अभिनेत्री रिया चक्रवर्ती त्याच्या आयुष्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)


सुशांतचे आर्थिक व्यवहार रिया पाहत होती. त्याच्या आत्महत्येनंतर तपास सुशांतच्या खात्यातून रियाने मोठी रक्कम तिच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूचा सर्व रोख रियावर आला.

हेही वाचा – ‘फायटर’ चित्रपटासाठी ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण घेणार मार्शल आर्टचे ट्रेनिंग

सुशांतसिंग ड्रग्सप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. तिला याप्रकरणी अटकही झाली होती. सुशांतसिंहच्या चाहत्यांकडून आजही रियावर अनेक आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत सुशांतसिंहच्या आत्महत्येला दोन वर्ष झाली म्हणत रियाने शेअर केलेले फोटो बघून नेटकरी, सुशांतसिंहचे चाहते नि:शब्द झाले आहेत.