आमिरप्रमाणे तुमचेही लग्न टिकणार नाही’; युजरच्या कमेंटवर भडकली रिचा चड्ढा

Richa Chadha loses temper with troll who said, 'your marriage won't last like Aamir Khan's'
आमिरप्रमाणे तुमचेही लग्न टिकणार नाही'; युजरच्या कमेंटवर भडकली रिचा चड्ढा

अभिनेत्री रिचा चड्ढा सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. यामुळे कधी कधी रिचा ट्रोलिंगची शिकार देखील होते. विशेष म्हणजे अभिनेता अली फजलसोबतच्या रिलेशनशिपमुळे रिचा ट्रोल्सचा निशाणा होते. परंतु रिचाला अशा ट्रोर्ल्सचे तोंड कसे बंद करायचे हे चांगलेच माहिती आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा रिचासोबत घडली आहे.

आज, सोमवारी रिचाने अलीसोबत एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केला होता. यामध्ये रिचाने आपले डोळे आपल्या हाताने बंद केले आहेत आणि तिचा मागे अली दिसत आहे. या फोटोसोबत रिचाने एक इमोजी शेअर केला आहे. या फोटोवरील युजरच्या प्रतिक्रियेवर रिचा जबरदस्त उत्तर दिले आहे. युजरने लिहिले होते की, ‘तुमचा घटस्फोट कधी होतोय, ते सांगा. कारण तुमचे लग्न आमिर खानप्रमाणे जास्त दिवस टिकणार नाही.’ युजरची ही प्रतिक्रिया रिट्वीट करून रिचाने त्याच्या भाषेत उत्तर दिले आहे. रिचा काय म्हणाली पाहा…

बऱ्याच काळापासून रिचा अलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या लग्नाबाबत नेहमी बातम्या येत असतात. दरम्यान आमिर खानने जुलैमध्ये किरण रावपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आमिर आणि किरणकडून जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले होते की, वेगळे होण्याचा निर्णय बऱ्याच दिवसांपूर्वी घेतला होता. घटस्फोटनंतर एका नव्या अध्यायाला आमिर आणि किरणने सुरुवात केली. परंतु पती-पत्नी म्हणून नाही, तर आई-वडील आणि कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. आमिरने दोघे एकत्र मिळून चित्रपटात, पाणी फाऊंडेशन आणि दुसऱ्या प्रोजेक्ट्ससाठी काम करणार आहेत, असे स्पष्ट केले होते. दरम्यान अलीने आमिर खानच्या ‘३ इडियट्स’ चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली होती.


हेही वाचा – Nusrat-Yash Baby: बाळाच्या जन्मानंतर नुसरत आणि यश यांचा मोठा खुलासा; म्हणाले…