घरमनोरंजनउत्तर प्रदेशमध्ये मध्यान्ह भोजनात आढळला उंदीर, बॉलीवूड अभिनेत्रीचे ट्विट

उत्तर प्रदेशमध्ये मध्यान्ह भोजनात आढळला उंदीर, बॉलीवूड अभिनेत्रीचे ट्विट

Subscribe

या घटनेवर ऋचाने केलेले ट्विटदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर मधील एका शाळेत मंगळवारी मध्यान्ह भोजनात मेलेला उंदीर आढळला. धक्कादायक बाब म्हणजे, भोजनातील डाळीत मेलेला उंदीर आढळण्यापूर्वीच शाळेतील अनेक मुलांना आणि स्टाफला जेवण वाढण्यात आले. परिणामी शाळेतील ९ विद्यार्थी आणि एका शिक्षकाची तब्येत बिघडल्याची घटना घडली. उत्तर प्रदेशातील या घटनेमुळे बॉलीवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढाने संताप व्यक्त केला आहे. ऋचा नेहमीच वर्तमानातील अशा संतापजनक घटनांवर व्यक्त होते. या घटनेवर ऋचाने केलेले ट्विटदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील शाळेतील निष्काळजीपणावर व्यक्त होताना ऋचाने ट्विट केले की, ‘उत्तरप्रदेशमधून आणखी काही बातम्या’ अभिनेत्रीच्या या ट्विटला लोकांकडून खूप कमेंट होत आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

दरम्यान मिड-डे मील योजनेंतर्गत ६वी ते ८वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत मध्यान्ह भोजन देण्यात येते. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत हापूड येथील जन कल्याण संस्थेतर्फे मिड-डे मील पुरवण्यात येते. मंगळवारी मिड-डे मीलमधील जेवण जेवल्याने शाळेतील ९ विद्यार्थी आणि एक शिक्षक यांची तब्येत बिघडली. तात्काळ त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही तासांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

- Advertisement -

सोनभद्र येथील घटना

दरम्यान मागील आठवड्यात सोनभद्र येथील एका शाळेत एक लीटर दूधात बादलीभर पाणी मिसळून ते दूध ८५ विद्यार्थ्यांना देण्यात येण्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये स्वयंपाकी हातात दूधाचा ग्लास घेऊन मुलांना भेसळयुक्त दुधाचे वाटप करताना दिसत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -