Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रिहाना पुन्हा ट्रोलर्सची शिकार, गणपतीचं लॉकेट घातलेला टॉपलेस फोटो व्हायरल

रिहाना पुन्हा ट्रोलर्सची शिकार, गणपतीचं लॉकेट घातलेला टॉपलेस फोटो व्हायरल

रिहानाच्या फोटोशूटवरून सोशल मीडियावर रंगली चांगलीच चर्चा

Related Story

- Advertisement -

अमेरिकेची पॉपस्टार रिहाना आपल्या गाण्यांसाठी आणि फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. सध्या भारतात तिची चर्चा सर्वाधिक आहे. कारण जेव्हापासून रिहानाने शेतकरी आंदोलना संदर्भात ट्विट केले, तेव्हापासून काही जण तिला पाठिंबा देत आहेत, तर काही जण तिच्यावर टीका करत आहेत. आता रिहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण ट्विटमुळे नाहीतर तर एका लॉकेटमुळे. रिहानाने केलेल्या फोटोशूटवर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. रिहानाने हे फोटोशूट लॉन्जरी ब्रँडसाठी केले आहे.

रिहानाच्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिहाना टॉपलेस असून काही एक्सेसरीज घातल्या आहेत. तिने गळ्यात गणपतीचं लॉकेट घातलं आहे. यामुळे रिहाना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. सोशल मीडियावर गणपतीच्या लॉकेटमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. हिंदू देवदेवतांचा फॅशनच्या नावाखाली अपमान करत असल्याची टीका केली जात आहे.

याबद्दल केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह काय म्हणाले?

- Advertisement -

रिहानाच्या या फोटोवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, ‘मी पाहिलं नाही आहे, पण भारतात सनातन धर्म हा खूपच सहिष्णू आहे. खूप धैर्यवान आहे, पण याचा गैरफायदा चित्रपट तयार करणारे, जाहिरातदार, तुकडे-तुकडे गँगवाले करत आहेत. ज्यांना जे काही वाटते, ते आपल्या देवदेवतांचा अपमान करत आहेत. परंतु इतर धर्मांचा अपमान झाला तर संपूर्ण जगात खळबळ माजते. पण आता आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.’

नेटकरी काय म्हणाले ते पाहा…

- Advertisement -


हेही वाचा – Sandeep Nahar sucide case: धोनी चित्रपटातील सुशांतनंतर आता संदीपचीही आत्महत्या


 

- Advertisement -