घरमनोरंजनरिंकूचा 'अनपॉज्ड' भेटीला

रिंकूचा ‘अनपॉज्ड’ भेटीला

Subscribe

रिंकूची 'हंड्रेड' ही हिंदी वेबसीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. त्यानंतर रिंकू आता अनपॉज्डच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सैराट फेम रिंकू राजगुरू म्हणजे महाराष्ट्राची लाडकी आर्ची. सैराट मधून आर्चीने सगळ्यांचीच मने जिंकली. रिंकूने मराठी सिनेसृष्टीत आपले हक्काचे स्थान मिळवून रिंकूने आता थेट बॉलिवुडमध्ये पदार्पण केले आहे. ‘अनपॉज्ड’ या नव्या हिंदी सिनेमात रिंकू राजगुरू दिसणार आहे. रिंकूने सिनेमाचा टिझर तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.  हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर सिनेमाचा ट्रेलर ८ डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे.


अनपॉज्ड या सिनेमात ५ शॉर्टफिल्म दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील एका फिल्ममध्ये रिंकू दिसणार आहे. विशेष म्हणजे पाचही फिल्मचे दिग्दर्शन पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केले आहे. राज अँड डिके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनश अरूण आणि नित्या मेहरा या पाच दिग्दर्शकांनी दिग्दर्शीत केलेल्या शॉर्ट फिल्म सिनेमात दाखवल्या जाणार आहेत.

- Advertisement -

तनिष्ठा चॅटर्जीने दिग्दर्शीत केलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये रिंकू राजगुरू दिसणार आहे. या फिल्मचा टिइर नुकताच रिलीज झाला आहे. यात रिंकूचा अनोखा अंदाज पहायला मिळत आहे. रिंकूची ‘हंड्रेड’ ही हिंदी वेबसीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. त्यानंतर रिंकू आता अनपॉज्डच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

रिंकूही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना तिच्या या नव्या सिनेमाची उत्सुकता आहे. रिंकूने सिनेमाचा टिझर आणि पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकतीच ती तिच्या नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनला गेली होती. तिथले फोटो आणि व्हिडिओ रिंकूने सोशल मीडियावर शेअर केले होते.


हेही वाचा – ‘पौरूषपुर’च्या निमित्ताने मिलिंद सोमण तृतीयपंथीच्या भूमिकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -