Video: रिंकू राजगूरुच्या ‘अनपॉज्ड’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर १८ डिसेंबरला रिलीज होणार

अभिनेत्री रिंकू राजगुरू

‘सैराट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. मराठी चित्रपट सैराट नंतर रिंकूने हिंदी वेबसिरीजमध्ये देखील अभिनय केला होता. रिंकूने मराठी सिनेसृष्टीत आपले हक्काचे स्थान मिळवून तिने आता थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. रिंकूची ‘हंड्रेड’ ही हिंदी वेबसीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. त्यानंतर रिंकू आता अनपॉज्डच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अनपॉज्ड’ या नव्या हिंदी चित्रपटात रिंकू राजगुरू तिच्या चाहत्यांना पुन्हा दिसणार असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

यामध्ये रिंकू वेगळ्या अंदाजात बघायला मिळणार आहे. तनिष्ठा चॅटर्जीचे दिग्दर्शन असलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये रिंकू राजगुरू दिसणार आहे. तिच्यासोबत लिलिट दुबेदेखील अभिनय करताना दिसणार आहे.

तसेच, हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी अॅमेझॉन पाइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा पाच दिग्दर्शकांनी दिग्शर्दित केलेल्या शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत. रिंकूने या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. रिंकू सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी तिने या चित्रपटाचे टिझर आणि काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


Husnn Hai Suhana Song Out: वरुण-साराची दिसणार जबरदस्त केमिस्ट्री