‘२०० हल्ला हो’ नंतर रिंकू राजगुरू दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात

२०१६ मध्ये प्रर्दशित झालेल्या सैराटच्या यशा नंतर आणि अफाट प्रसिध्दी नंतर रिंकु राजगुरूने मागे वळून पाहिलेच नाही. रिंकूचे ‘आर्ची’ हे पात्र अजरामर झाले. त्यानंतर रिंकूला रातोरात चित्रपटांच्या मागण्या येऊ लागल्या. रिंकूने सिनेमाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले. आणि आता मराठी सिनेसृष्टी प्रमाणे हिंदी सिनेसृष्टी मध्ये झेप घेतली आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू नेटफ्लिक्सच्या आगामी ‘अनकही कहानिया’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच तिच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यातील एका कथेत रिंकू राजगुरु झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या चित्रपटातील कथांसाठी दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतच या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

रिंकू राजगुरूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती शेअर केली आहे. रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, “या मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही. अश्याच प्रेमाची अनकही कहानिया लवकरच नेटफ्लिक्सवर 17 सप्टेंबरला येत आहे.

रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचा संर्पकात असते. तसेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.