HomeमनोरंजनRishabh Shetty : 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Rishabh Shetty : ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Subscribe

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रत्येक मराठी मनात एक हळवा कोपरा आहे. त्यांच्या कार्याचा वेध घेणारे, त्यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट मराठीत येऊन गेले आहेत. याच महाराजांच्या महान कार्याची भुरळ आता बॉलीवूडलाही पडली आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एका बिग बजेट सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. कांतारा चित्रपटामुळे संपूर्ण देशातील घराघरात पोहोचलेला कानडी अभिनेता ऋषभ शेट्टी आता या चित्रपटाद्वारे प्रमुख भूमिकेतून सर्वांसमक्ष येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारीत पॅन इंडिया चित्रपट साकारला जात असून ऋषभ त्यामध्ये शिवरायांची भूमिका साकारत आहेत. याबाबतची माहिती ऋषभने स्वतःच दिली आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. 21 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. संदीप सिंह हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी आधी मेरी कॉम, वीर सावरकर, सरबजीत अशा सिनेमांची निर्मिती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SANDEEP SINGH (@officialsandipssingh)

- Advertisement -


चित्रपटाचं पहिलं पोस्टर सादर करताना ऋषभने एक पोस्ट केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” भारतातील महान योद्धा व महान राजाची गाथा प्रस्तुत आम्ही करत आहोत. दी प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज ; हा केवळ एक चित्रपट नाही. हा एका योद्ध्याच्या सन्मानार्थ केलेला युद्धघोष आहे. ज्याने अनेक वादळं पायदळी तुडवत हिंदवी स्वराज्य साकारलं आणि शक्तिशाली मुघल साम्राज्याला आव्हान दिलं. ज्या राजाने आपल्याला मोठा वारसा दिला ही त्याची गोष्ट… 21 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित केली जाईल.”

आशा भोसलेंची नात सिनेसृष्टीत करणार पदार्पण

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये ऋषभ शिवरायांच्या पेहरावात अगदी उठून दिसतोय. त्याच्या हातात भवानी तलवार आहे आणि तो पाठमोरा उभा आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर भारताचा नकाशा आहे ज्यावर हिंदवी स्वराज्य, हिंदू पद पादशाही असं लिहिलेलं दिसत आहे.

- Advertisement -

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले लवकरच या ऐतिहासिक चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जनाई ही या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ‘नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -