घरताज्या घडामोडीSharmaji Namkeen Trailer : ऋषि कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकिनचा ट्रेलर...

Sharmaji Namkeen Trailer : ऋषि कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकिनचा ट्रेलर रिलीज

Subscribe

प्राइम व्हिडीओवर शर्माजी नमकिन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात ऋषि कपूर यांच्यासह परेश रावल ,जूही चावला, सुहैल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्डा आणि ईशा तलवार हे कलाकार आहेत.

दिवगंत अभिनेते ऋषि कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन लवकरच ओटीट प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ऋषि कपूर यांचे निधन होण्याआधी चित्रपटाचा बराचसा हिस्सा शुट करण्यात आला होता. परंतु अनपेक्षितपणे ऋषि कपूर यांनी या जगाला अलविदा म्हटलं. त्यानंतर ऋषि कपूर यांच्या जागी अभिनेते परेश रावल यांना रिप्लेस करण्यात आलंय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला ऋषि कपूर आणि परेश रावल दोघेही शर्माजीच्या भूमिकेत दिसत आहेत.  प्राइम व्हिडीओवर शर्माजी नमकिन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात ऋषि कपूर यांच्यासह परेश रावल ,जूही चावला, सुहैल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्डा आणि ईशा तलवार हे कलाकार आहेत.

 

- Advertisement -

ऋषि कपूर यांचा हा शेवटचा चित्रपट हितेश भाटीयाने डिरेक्ट केलाय. डिरेक्टर म्हणून त्याचा पहिलाच चित्रपट आहे.   ३१ मार्च ला हा चित्रपट अँमेझॉन प्राइम व्हिडीओवर जगभरातील २४० देशांमध्ये रिलीज होणार आहे.परंतु दुर्दैवाने चित्रपट पाहण्यासाठी ऋषि कपूरआपल्यात नाहीत.

आत्म साक्षात्कार आणि आत्म शोधाची एक आकर्षक आणि ह्रदयस्पर्शी कथा शर्माजी नमकीन या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका निवृत्त पुरुषाच्या जिवनाची कथा चित्रपटात मांडण्यात आलीय. ज्याला निवृत्तीनंतर स्वयंपाक करण्याची गोडी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

३० एप्रिल २०२० मध्ये अभिनेते ऋषि कपूर यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. ऋषि कपूर यांचा अभिनय कारकिर्दीतील शर्माजी नमकिन हा शेवटचाचित्रपट ठरला. वडिलांचा शेवटचा चित्रपट पूर्ण करण्यासाठी रणबीर कपूर स्वत: चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला असे त्याने स्पष्ट केलं. यासंबंधी एक व्हिडीओ देखील रणबीरने शेअर केला होता.


हेही वाचा –  ‘रौद्र’ मराठी सिनेमाचा ट्रेलर अन् म्युझिक लाँच

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -