घरताज्या घडामोडी'काहे दिया परदेस' मधील ती लाडकी जोडी अडकली लग्नबंधनात?

‘काहे दिया परदेस’ मधील ती लाडकी जोडी अडकली लग्नबंधनात?

Subscribe

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील शीव आणि गौरी तुम्हाला आठवतायत का? ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या जोडीवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. मराठी मुलगी आणि उत्तर प्रदेशमधील मुलगा अशी एक वेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली. या मालिकेवरही प्रेक्षकांन तितकच प्रेम केलं. ही जोडी पुन्हा कधी भेटायला येणार अशी इच्छा प्रेक्षकांना होती. अखेर एका गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांची ही इच्छा पुर्ण झाली आहे.

View this post on Instagram

"तिच्या मनानं त्याच्या दिलावर जणू इश्कच केलाय! त्यांच्या प्रेमाने त्यांचा जीव कसा बघ, लाजीरा झालाय" -अनुभव एक कथा पुन्हा नाही घडू शकत पण जोडी? हां ती नक्कीच पुन्हा भेटू शकते…शिव गौरीची एक गोष्ट होती! आता एक गाणं चालेल? होऊ दे थोडा जीव लाजीरा?? So…Let the love fly…Let the story begin but to start that we should switch it on first! *Let's switch on the red bulb music; Feel the love!* • • • #lajira #comingsoon #rishisaxena #sayalisanjeev #staytuned #stayhome #staysafe

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

- Advertisement -

आपण ‘म्युझिक इज लाईफ’ असे अनेकदा म्हणतो. म्युझिक कोणत्याही प्रकारचे असो त्या मागील भावना ही नेहमीच स्पेशल असते. साऊथ आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक सिनेमांचे डिस्ट्रीब्युशन आणि मराठी सिनेमाची निर्मिती केल्यानंतर रेड बल्ब स्टुडियोझ् या फिल्म प्रॉडक्शन कंपनीने प्रेक्षकांना म्युझिकल ट्रिट देण्यासाठी ‘रेड बल्ब म्युझिक’ हे म्युझिक लेबल नुकतेच लॉन्च केले आहे.  या म्युझिक लेबलचं पहिलं गाणं ‘लाजीरा’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

काहे दिया परदेस’ या मालिकेत शिव आणि गौरी यांची भूमिका साकारणारी जोडी ऋषि सक्सेना आणि सायली संजीव ही संपूर्ण महाराष्ट्राची फेव्हरेट जोडी बनली होती. या गोड, नटखट आणि प्रेमळ जोडीवर आधारित रेड बल्ब म्युझिकचे ‘लाजीरा’ हे लव्ह साँग प्रदर्शित झाले आहे.

- Advertisement -

विपुल घंगाळे यांनी लिहिलेल्या ‘लाजीरा’ गाण्याला केवल वाळंज आणि विकास विश्वकर्मा यांनी संगीत दिले आहे. तर केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांनी गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याची कोरिओग्राफी मिस्टी भावर यांनी केली आहे. ‘लाजीरा’ गाण्याने ‘रेड बल्ब म्युझिक’चा श्रीगणेशा झालेला आहे.आणि आता त्यांची आणखी नवीन गाणी प्रेक्षकांना लवकरच ऐकायला, पाहायला मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -