घरमनोरंजन'या' कारणास्तव रितेश आणि जेनिलियाने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले..

‘या’ कारणास्तव रितेश आणि जेनिलियाने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले..

Subscribe

महाविकास आघाडीमधील दुसऱ्या अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला होता. याबाबत त्यांनी केलेल्या घोषणेमुळे रितेश आणि जेनिलियाने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र राज्याचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडीमधील हा दुसरा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात ‘ईस्टर्न फ्री वे मार्गाला’ दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी अजित पवारांनी केली होती. याबाबत जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे. यासंबंधी एक पोस्टही जेनिलिया आणि रितेश ने त्यांच्या सोशलमीडियावर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

- Advertisement -

मुंबईची वाहतूक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्र तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबी शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्याच्यामुळेच हा महामार्ग तयार होऊ शकला होता. त्यामुळे पुर्व मुक्त मार्गास माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गेल्या वर्षी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोड पासुन ते चेंबुर येथील पूर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडला जातो. या रस्त्याची लांबी १६.८ कि.मी. आहे. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्याची माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्यांची पोचपावती असेल असेही त्यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले होते.

- Advertisement -

हे वाचा- प्रेक्षकांचा निरोप घेताना ‘बबड्या’ झाला भावूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -