घरमनोरंजनRitesh- Genelia: मिस्टर अँड मिसेस देशमुखांच्या सुखी संसाराला 12 वर्ष पूर्ण!

Ritesh- Genelia: मिस्टर अँड मिसेस देशमुखांच्या सुखी संसाराला 12 वर्ष पूर्ण!

Subscribe

महाराष्ट्राला वेड लावणारे दादा- वहिनी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा- देशमुख. बॅालिवुडसह मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे लाडके कपल नेहमीच सुपरहिट चित्रपटांमुळे चर्चेत असतात. नेहमी त्यांच्या नात्यातून ते इतरांना प्रेरणा देतात. रितेश- जिनिलियाचा 2003 पासून सुरु झालेला ‘रील’ आयुष्यातील त्यांचा प्रवास ‘रिअल’ आयुष्यात रुपांतरीत झाला. 3 फेब्रुवारी 2012 रोजी त्यांनी लग्न केले. आणि डिसुझांची लेक ही मराठमोळ्या देशमुखांची सून झाली. दरम्यान आज 3 फेब्रुवारी 2024 ला त्यांच्या सुखी संसाराला 12 वर्ष पूर्ण झाली.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. रितेश आणि जिनिलियाचा ‘तुझे मेरी कसम’ ते महाराष्ट्राचे लाडके दादा- वहिनी होण्यापर्यंतचा प्रवास कमाल होता. 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाद्ववारे या लाडक्या जोडीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. पुढे त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

- Advertisement -

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटानंतर ‘मस्ती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अखेर 10 वर्षाच्या डेटींगनंतर रितेश- जिनिलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरांच्या संमतीने त्यांनी ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने अगदी थाटामाटात लग्न केले. रितेश- जिनिलियाने त्यांच्या मुलांची नावे रियान आणि राहिल अशी ठेवली.
दहा वर्ष एकमेकांबरोबर असताना जिनिलिया अनेक वेळा देशमुखांकडे गेली होती. यावेळी अभिनेत्री जिनिलिया सांगते, “रितेशच्या आईमुळे मला चांगलं मराठी येऊ लागलं. लग्नाआधी मी रितेशची मैत्रीण म्हणून त्यांना भेटले होते. त्या सुरुवातीच्या दिवसात मला फार भिती वाटायची. हे मुख्यमंत्र्यांचे घर आपण कसं वागावं, कसं बोलायचं? हे कळत नव्हतं. पण अगदी सर्वसामान्य लोकांप्रमाणे घरात ते सर्व वावरत होते. एवढं सुंदर वातावरण त्यांच्या घरी होतं”

दोघेही एकमेकांना प्रेमाने ‘या’ नावाने मारतात हाक
जिनिलियाने एका कार्यक्रमात दोघेही एकमेकांना काय नावाने हाक मारतात याबद्दल खुलासा केला होता. रितेश जिनिलियाला फार पूर्वीपासून ‘जीन्स’ या नावाने हाक मारतो. तर याउलट जिनिलिया रितेशला प्रेमाने ‘ढोलू’ अशी हाक मारते.
कौटुंबिक जबाबदारी पार पाडल्यानंतर अभिनेत्री जिनिलियाने 10 वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. जिनिलियाचा ‘वेड’ हा पहिलाच मराठी चित्रपट सुपरहिट ठरला. महाराष्ट्राच्या या लाडक्या गोड आणि आदर्श जोडीला सुखी, वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -