घरट्रेंडिंगVideo - लॉकडाऊनमध्ये रितेशने शेअर केलेला व्हीडिओ बघून पोट धरून हसाल!

Video – लॉकडाऊनमध्ये रितेशने शेअर केलेला व्हीडिओ बघून पोट धरून हसाल!

Subscribe

लॉकडाऊनच्या निमित्ताने रितेशने आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रितेश आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडचं कपल नेटकऱ्यांचं खूप लाडकं आहे. आणि माऊलही कोणाला नाराज करत नाही तो कायमच जेनेलिया बरोबर व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांच्या दोघांच्या व्हीडिओला खूप लाईक्स आणि कमेंट्यस ही चाहते देत असतात. नुकताच लॉकडाऊनच्या निमित्ताने रितेशने आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसून वेडे व्हाल. हा गमतीशीर व्हीडिओ तुम्हाला नक्की आवडेल. सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. प्रत्येकालाच प्रश्न पडतो आपल्याप्रमाणे सेलेब्रेटी घरातबसून काय करत असतील. तर रितेशने हा व्हीडिओत त्याचं उत्तर दिलं आहे. या व्हीडिओत रितेश भांडी घासताना दिसत आहे आणि रितेशवर लक्ष ठेवण्यासाठी जेनेलिया हातात लाटणं घेऊन उभी आहे.

View this post on Instagram

Happy Gudi Padwa

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

- Advertisement -

रितेशने अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त हा व्हीडिओ शेअर केला आहे. अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने हा व्हीडिओ रितेशने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेशची पत्नी जेनेलिया त्याच्याकडून चक्क भांडी घासून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बॅकराऊंडला अजय देवगनच्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील ‘मौका मिलेगा तो हम बता देंगे’ हे गाणे वाजत आहे.

रितेशने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमीप्रमाणेच नेटकऱ्यांना हा व्हीडिओ जबरदस्त आवडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -