घरCORONA UPDATEरितेश देशमुखने केली सलमानची नक्कल; टिकटॉक व्हिडिओ व्हायरल

रितेश देशमुखने केली सलमानची नक्कल; टिकटॉक व्हिडिओ व्हायरल

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख वारंवार सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज अपलोड करताना दिसत आहे. आता तर त्याने चक्क भाईजान सलमान खानवर टिकटॉक व्हिडिओ बनवला असून तो चांगला व्हायरल होत आहे. एका गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये सलमान खान आणि त्यांच्या फॅनमध्ये एक मजेदार संवाद झाला होता. त्या संवादाचा व्हिडिओ रितेशने केला आहे. रिअॅलिटी शोची स्पर्धक आसमा रफी हिच्या आवाजावर रितेशचा हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सलमान खान या महिलेकडे अरबी भाषेत आपल्या एका गाण्याची फर्माइश करत आहेत. १९९९ साली आलेल्या बिवी नं. १ चित्रपटातील चुनरी चुनरी…, हे गाणं सलमान खान या महिलेला सुचवत आहे. मात्र आसमा हिने, आपण चुनरी हाच एक शब्द खुप प्रयत्नाने आत्मसात केला असून संपूर्ण गाणं अरबीत म्हणणं कठिण असल्याचं इथे सांगत आहे. हा मजेशीर व्हिडिओ सलमान खान आणि रितेश देशमुख या दोघांच्या चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.

- Advertisement -

यापूर्वीही रितेश आणि जिनेलिया देशमुख यांनी आपले टिकटॉक व्हिडिओ बनवले असून त्यांच्या चाहत्यांनी ते खुप पसंत केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रितेश-जिनेलिया हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करताना अनेकदा दिसून येत आहेत. त्या दोघांच्या व्हिडिओला खुप लाईक्स आणि कमेंट्यस ही चाहते देतात. लॉकडाऊनच्या निमित्ताने रितेशने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

हेही वाचा –

धक्कादायक! एकाच एटीएममध्ये गेलेल्या ३ जवानांना कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -