रितेश देशमुखने ट्विट करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना दिल्या शुभेच्छा

रितेश देशमुखने आपल्या ट्वीटर अकाउंटवर नुकत्याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्याने उपमुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतर अखेर काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली, तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास राजभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदेंच्या दहा दिवसाच्या बंडाचे फळ त्यांना मिळाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सामाजिक , राजकीय, सामान्य जनता तसेच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांकडूनही एकनाथ शिंदेंना अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत अभिनेता रितेश देशमुखने एकनाथ शिंदेंना आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडियावर तो वारंवार विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. दरम्यान सध्या सर्वत्र राजकीय घटनांचीच चर्चा सुरू आहे. अशात अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडत आहेत. रितेश देशमुखने सुद्धा यासंदर्भात आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.

रितेश देशमुखने आपल्या ट्वीटर अकाउंटवर नुकत्याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्याने उपमुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये रितेशने एकनाथ शिंदे यांचा एक फोटो शेअर करत कॅप्शन दिलंय की, “श्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा”.

याशिवाय रितेश देशमुखने आणखी एक ट्वीट शेअर केले आहे. यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.तसेत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज आपण शपथ घेतली. आपले खूप खूप अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा”.

 


हेही वाचा :सफलतेची एक प्रेरणादायी गोष्ट… कंगना रनौतने एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा