अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सध्या त्यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.
रितेश आणि जिनिलिया आपल्या कुटुंबासह सौदी अरेबियामध्ये फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी गेले होते. १ फेब्रुवारीला अल-नासर विरुद्ध इंटर मायामी फुटबॉलचा सामना किंगडम एरिना, रियाध, सौदी अरेबिया येथे पार पडला. रितेश, जिनिलिया आणि त्यांची मुले रियान आणि राहील आणि रितेशचा भाऊ धीरज आणि वहिनी दीपशिखा त्यांच्या मुलांसह या सामन्याला उपस्थित होते.
रितेश आणि जिनिलियाच्या मुलांना फुटबॅाल खेळ खूप आवडतो. जिनिलिया नेहमीच रियान आणि राहिलच्या फुटबॅाल खेळाच्या सरावाचे फोटोज् आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी रितेश आणि त्याच्या भावाची मुले या मॅचदरम्यान स्टेडियममध्ये आनंद लुटताना दिसले.