Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'महाभारत' सिनेमात रिया झळकणार 'द्रौपदीच्या' भूमिकेत ?

‘महाभारत’ सिनेमात रिया झळकणार ‘द्रौपदीच्या’ भूमिकेत ?

महाभारतामधील द्रौपदीची भूमिका साकारने रियासाठी  खूप आव्हानात्मक आणि नाविन्यपूर्ण असणार आहे. रिया सध्या याबद्दल विचार करून निर्णय  घेणार असल्याचे कळतेय.

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती प्रचंड चर्चेत आली होती. रियाला ड्रग्स प्रकरणात अटक सुद्धा झाली होती.गेल्यावर्षी रिया ‘जलेबी’ या सिनेमात झळकली होती. हा एक रोमॅंटिक ड्रामा सिनेमा होता. आता रियाचा आगामी सिनेमा ‘चेहरे’ लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये दिग्गज अभिनेते अमिताभ बचन,इमरान हाश्मी,अनु कपूर,क्रिस्टल डिसूझा यांची मुख्य भूमिका आहे. महितीनुसार रियाला ‘महाभारत’ या बिग बजेट मायथोलॉजिकल सिनेमामध्ये ‘द्रौपदी’ या प्रमुख पत्राचा रोल ऑफर झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रिया चक्रवर्ती लवकरच एका मोठ्या प्रोजेक्ट मध्ये द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच पिंकविलाच्या सूत्रांनुसार रियासाठी आगामी सिनेमा तसेच प्रोजेक्ट अत्यंत मोठा असणार आहे. महाभारतामधील द्रौपदीची भूमिका साकारने रियासाठी  खूप आव्हानात्मक आणि नाविन्यपूर्ण असणार आहे. रिया सध्या याबद्दल विचार करून निर्णय  घेणार असल्याचे कळतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

मॉर्डन वर्ल्डनुसार दाखवणार सिनेमा .
- Advertisement -

महितीनुसार हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. सिनेमात द्रौपदी (Draupadi) आणि महाभारत (Mahabharata) यांच्याशी संबंधित खूप हटके असणार आहे तसेच सिनेमाची कथा मॉर्डन वर्ल्ड आणि आजच्या समाजपद्धतीनुसार चित्रित करण्यात येणार आहे. अशी माहिती समोर येत आहे


हे हि वाचा – मधुर भंडारकर बनवणार मेहुल चॉक्सीवर सिनेमा? ट्विट करून दिली माहिती

- Advertisement -