घरमनोरंजनफिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स : 'रॉकेट बॉईज'ला 6 पुरस्कार; 'पंचायत 2' आणि 'दसवी'चा सुद्धा जलवा

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स : ‘रॉकेट बॉईज’ला 6 पुरस्कार; ‘पंचायत 2’ आणि ‘दसवी’चा सुद्धा जलवा

Subscribe

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2022 ची मुंबईमध्ये घोषणा करण्यात येणार आहे. याआधी टेक्निकल श्रेणीतील अवॉर्ड्स देखील देण्यात आले आहेत. या अवॉर्ड्स शोमध्ये जॅका श्रॉफ, दिया मिर्जा, नीना कुलकर्णी, शमा सिकंदर, जरीन खान, रश्मि देसाई, रवीना टंडन, अमायरा दस्तूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, श्वेता त्रिपाठी, नताशा भारद्वाज आणि अनुप्रिया गोयंका यांसारख्या अनेक कलाकारांना स्पॉट करण्यात आलं.

‘पंचायत 2’ मधील ‘या’ कलाकारांना मिळाला अवॉर्ड

- Advertisement -

फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट वेब सीरिजबद्दल ‘पंचायत 2’ मधील अनेक कलाकारांना अवॉर्ड देण्यात आले. रघुवीर यादव यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा अवॉर्ड मिळाला तर नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा अवॉर्ड मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जितेंद्र कुमार यांना देण्यात आला.

‘दसवी’ वेबसीरिजला सर्वोत्कृष्ट वेबसीरिज अवॉर्ड देण्यात आला

- Advertisement -

फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फिल्म वेब ओरिजिनल ‘दसवी’ या वेबसीरिजला देण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता वेब ओरिजनल फिल्म अवॉर्ड अनिल कपूर यांना देण्यात आला.

‘रॉकेट बॉईज’ला टेक्निकल अवॉर्ड्समध्ये मिळाले 6 पुरस्कार

‘रॉकेट बॉईज’ या वेबसीरिजने टेक्निकल अवॉर्ड्समध्ये बेस्ट ओरिजिनल, स्क्रीनप्ले सीरीज, बेस्ट कॉस्टयूम डिझाइन सीरीज, बेस्ट प्रोडक्शन डिझाइन, बेस्ट सिनेमॅटोग्राफर आणि बेस्ट वीएफएक्स असे एकूण 6 पुरस्कार मिळाले आहेत.

 


हेही वाचा :

भारतातील ‘छेलो शो’ आणि ‘RRR’चे ऑस्करमध्ये नामांकन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -