रोहनप्रितने दिलं नेहा कक्करला खास Valentine सरप्राइज ! सगळ्यांसमोर नवऱ्याला केलं किस

नेहासाठी चॅाकलेट केक बरोबर एक रेड रोज सुद्धा आणलं होतं. याच दरम्यान नेहा आणि रोहनप्रित एकमेकांना किस करताना सुद्धा दिसून आले.

Valentine’s Day : नेहा कक्कर आणि रोहनप्रित सिंह बॅालीवूड मधील सगळ्यात क्यूटेस्ट जोड्यांमधील एक जोडी आहे. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात, आणि आपल्या प्रेमाची कबुली ही ते वारंवार आपल्या सोशल मिडिया देत असतात. आज व्हॅलेंटाईन डे  निमित्ताने रोहनप्रित सिंहने आपली पत्नी नेहा कक्करला एक सरप्राइज दिलं, त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर झाले आहेत. या फोटोंमध्ये रोहनप्रित नेहाला पैम्पर करताना दिसत आहेत. नेहाने हे फोटो शेयर करत, एक खूप छान कैप्शन सुद्धा लिहिला आहे.

नेहा कक्करने आपल्या इंस्टाग्राम वर एका नंतर एक असे अनेक फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये रोहनप्रित सुद्धा दिसून येत आहे. रोहनप्रितने स्वतः नेहासाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त सरप्राइज प्लान केलं होतं. त्याचप्रमाणे नेहासाठी चॅाकलेट केक बरोबर एक रेड रोज सुद्धा आणलं होतं. याच दरम्यान नेहा आणि रोहनप्रित एकमेकांना किस करताना सुद्धा दिसून आले.

“तो आपल्या नेहूला स्पेशल फील करण्याची एकही संधी सोडत नाही. आय लव यू रोहनप्रित सिंह. Happy Valentines Day Everyone.”  असे कॅप्शन देत नेहाने फोटो शेयर केलेत. नेहा कक्करच्या या पोस्ट वर रोहनप्रितने सुद्धा, “आय लव यू मिसेस सिंह” अशी कमेंट केली आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी दोघांवर प्रचंड प्रेम व्यक्त केले आहे.

नेहाच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर नेहाने नुकतेच तिचा भाऊ टोनी कक्करसोबत ‘मुड मुड’ के हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अभिनेत्री जॅकलिन आणि इटालियन अभिनेता मिकेल मोरेन यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळली आहे.


हेही वाचा –  प्रेक्षकांना Valentine स्पेशल गिफ्ट ! Radhe Shyam चं नवं पोस्टर रिलीज