घरताज्या घडामोडीआर्थिक अडचणीशी सामना करणाऱ्या शगुफ्ता अलीच्या मदतीला धावून आला रोहित शेट्टी

आर्थिक अडचणीशी सामना करणाऱ्या शगुफ्ता अलीच्या मदतीला धावून आला रोहित शेट्टी

Subscribe

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सासू शगुफ्ता अली सध्या चर्चेत आली आहे. कारण ती सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये काही दिवसांपूर्वी सांगितले होते. २० वर्षांपासून शगुफ्ता कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात होती. आता डोळ्यांच्या उपचारासाठी देखील तिच्याकडे पैसे नाही आहेत. शिवाय वयोवृद्ध आईची ती देखभाल करत आहे. तिला जिथे कुठे जायचे असेल तिथे ती सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत आहे. माहितीनुसार दररोजच्या गरजा भागवण्यासाठी तिने अनेक मौल्यवान वस्तू विकल्या आहेत. आता मधूमेह आणि आरोग्य संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी ती दुसऱ्यावर अवलंबून आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती सध्या धडपड करत आहे.

शगुफ्ताच्या अशा परिस्थिती आता टेलिव्हिजनमधील अनेक कलाकार मदतीला धावून येत आहेत. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अभिनेत्री नीना गुप्ता, अभिनेता सुमित राघवन आणि ‘सावधान इंडिया’चा होस्ट सुशांत सिंह शगुफ्ताच्या मदतीसाठी पुढे आले आहे. माहितीनुसार आता बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने देखील शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

- Advertisement -

पिंकविलाच्या माहितीनुसार, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशनचे प्रेसिडेंट अशोक पंडित यांनी याबातमीला दुजोरा देत सांगितले की, जेव्हा मला शगुफ्ता अलीच्या आर्थिक परिस्थितीबाबत समजले तेव्हा मी तिच्यासोबत बातचित केली. आम्ही तिला कशाप्रकारची मदद करू शकतो हे विचारले. तिची सर्व गोष्ट ऐकल्यानंतर मी तात्काळ रोहित शेट्टीसोबत बोललो आणि तो शगुफ्ताला मदत करण्यास तयार झाला.

अशोक पंडित म्हणाले की, रोहित शेट्टीने खूप चांगली मदत केली आहे. आम्ही सर्वजण त्याचे आभारी आहोत. आम्ही इंडस्ट्रीचे अजूनही अनेक कलाकारांकडून मदत करण्यासाठी मागणी करत आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – तापसीच्या आईवडिलांनी व्यक्त केली तिच्या लग्नाची चिंता म्हणाले,आता कोणाशीही लग्न कर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -