‘खतरों के खिलाडी 12’ चे शूटिंग सुरू होताच रोहित शेट्टीने मारली जबरदस्त एन्ट्री

'खतरों के खिलाडी 12' च्या शूटिंगला आता सुरूवात करण्यात आली आहे.रोहित शेट्टीने याबाबत स्वताः माहिती दिली असून कलर्स वाहिनी आणि रोहित शेट्टीने यासंबंधीत व्हिडीओ शेअर केला आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘खतरों के खिलाडी 12′ लवकरच हिंदी कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या रियालिटी शोमध्ये दिसणारे स्पर्धक केप टाउन येथे पोहोचले आहेत.’खतरों के खिलाडी 12’ च्या स्पर्धकांनी केपटाउन येथे शूटिंगला सुरुवात केलेली आहे. रोहित शेट्टीने याबाबत स्वताः माहिती दिली असून कलर्स वाहिनी आणि रोहित शेट्टीने यासंबंधीत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी हवेशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी हेलीकॉप्टरमध्ये उभे राहून पोज देताना दिसत आहे.

या व्हिडीओ शेअर करत रोहित शेट्टीने सांगितले की, ‘खतरों के खिलाडी 12’ च्या शूटिंगला आता सुरूवात करण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवलेली आहे. प्रेक्षक ‘खतरों के खिलाडी 12’ पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. यावेळीच्या ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये शिवांगी जोशी, जन्नत जुबैर, मिस्टर फैजू, रुबीना दिलाइक, अनेरी वाजनी, सृति झा, राजीव अदातिया आणि मोहित मलिक यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

या सर्व स्पर्धकांनी केपटाउन येथील फोटो आणि व्हिडीओ शेअर करायला सुरूवात केली आहे. जन्नत जुबैर, मिस्टर फैजू यांनी नुकताच आपल्या सोशल मीडियावर रोहित शेट्टीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

‘खतरों के खिलाडी 12’ ७ ते ८ ऑगस्टपासून प्रसारित होऊ शकतो. मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

 


हेही वाचा :http://IIFA २०२२ च्या लुक मुळे ऐश्वर्या पुन्हा झाली ट्रोल