‘रूही’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दमदार परफॉर्मन्स

Roohi box office day 3: Janhvi Kapoor's film records biggest day so far, collects ₹8.7 crore total
'रूही' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दमदार परफॉर्मन्स

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर ‘रूही’ चित्रपट सध्या बॉक्स दमदार परफॉर्मन्स देत आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटातगृहात प्रदर्शित होणार हा पहिलाच मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चाहते दोन वर्षांपासून खूप आवडत पाहत होते. गेल्यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले गेले. अनलॉकनंतर ११ मार्चला या चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

या चित्रपटाला जितकी अपेक्षा होती, तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना व्हायरसमुळे देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सुरुवातीलाच ३.६ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. पण विकेंड असल्यामुळे शनिवारी कमाईत चांगली वाढ झाली. ३.४२ कोटी रुपयांची कमाई ‘रूही’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली. एकूण तीन दिवसांमध्ये ८.७३ कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला. आता असे म्हटले जात आहे की, आज (रविवार) चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळेल.

माहितीनुसार, महाशिवरात्री निमित्ताने सुट्टी असल्यामुळे याचा फायदा उचलण्यासाठी ‘रूही’ चित्रपट संपूर्ण देशातील दोन हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित केला गेला. जिओ स्टुडिओची एसएफओ प्रियांका चौधरींनी सांगितले की, ‘आम्ही खूप आनंदी आहोत की, संपूर्ण देशात प्रेक्षक इतके प्रेम आणि सकारात्मकपणे प्रतिसाद देत आहेत. चित्रपटसृष्टीसाठी ‘रूही’ एक महत्त्वाचा टप्पा आहे. जिओ स्टु़डिओ चेंजमेकर असल्याचा अभिमान वाटत आहे.’


हेही वाचा – बालपणींच्या आठवणींना उजाळा देत सिध्दार्थ झाला भावूक