RRR सिनेमा रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात ; तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल

दिग्दर्शक एसएस राजामौली अनेक अडचणींचा सामना करत आहेत. या सिनेमाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या आरआरआर या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे.

RRR Cinema in the midst of controversy even before its release
RRR सिनेमा रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात ; तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल

कोरोनाच्या सावटामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच अनेक सिनेमांचे प्रदर्शनाला सुरुवात झाली.दरम्यान, ‘आरआरआर’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली अनेक अडचणींचा सामना करत आहेत. या सिनेमाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘आरआरआर’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. या सिनेमावर दोन स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा आरोप करण्यात आला आहे.

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने ‘आरआरआर’ सिनेमाविरोधात ही जनहित याचिका दाखल केली असून, सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. सिनेमात अनेक ऐतिहासिक तथ्यांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. याशिवाय सेन्सॉर बोर्डाने या बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती कठोर कारवाई करावी,अशी मागणी या विद्यार्थांनी केली आहे.

प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली

एसएस राजामौली यांचा बिग बजेट आरआरआर (RRR) या साऊथ इंडियन सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ( RRR movie release date Postponed ) ७ जानेवारीला सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार होता. मात्र देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या आधी हा सिनेमा ३० जुलै २०२० साली प्रदर्शित होणार होता मात्र सिनेमावर कोरोनाचे सावट आल्याने सिनेमा लांबणीवर पडला. आता परिस्थिती सुधारल्याने सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला होता मात्र पुन्हा एकदा कोरोनामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे.


हेही वाचा – गश्मीर महाजनी इमलीची मालिका सोडणार, निर्मात्यांनी शोधला नवा पर्याय