‘RRR’ चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये डंका; हॉलिवूड क्रिटिक्स 2023 मध्ये पटकावले पुरस्कार

टॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाने गेल्या वर्षभरापासून नवनवीन रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटाला फक्त भारतीय प्रेक्षकांचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवला होता. दरम्यान, आता हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स देखील जिंकले. या चित्रपटाने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तीन पुरस्कार पटकावले आहेत.

 

शुक्रवारी रात्री हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये ‘RRR’ ने चार पुरस्कार जिंकले. राम चरण आणि जूनियर एनटीआर यांच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अॅक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य, सर्वोत्कृष्ट मूळ गाणे आणि सर्वोत्कृष्ट स्टंटसाठी पुरस्कार मिळवला.

‘RRR’ चित्रपट एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण आदिवासी नेते कोमाराम भीम आणि क्रांतिकारक अल्लुरी सीता रामा राजू यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे आलिया भट्टने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकणी, रे स्टीव्हन्सन, मकरंद देशपांडे आणि ऑलिव्हिया मॉरिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

ऑस्करमध्ये ही नामांकन

रामचरण ,जूनियर एनटीआर

‘RRR’चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करमध्ये देखील नामांकन मिळालं आहे. 12 मार्च हा सोहळा संपन्न होणार आहे.

 


हेही वाचा :

वेरूळ- अजिंठा महोत्सवात कथ्थक, भरतनाट्यम आणि लावणीने रसिक मंत्रमुग्ध