ऑस्कर 2023 मध्ये RRR च्या टीमला नव्हती फ्री एंट्री, एका सीटसाठी मोजले इतके रुपये

ऑस्कर सोहळ्यासाठी जागा आरक्षित करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने किती खर्च केला हे तुम्हाला माहिती आहे का?

Oscars-2023-RRR-Seat-Price

नुकताच १२ मार्च रोजी ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला, या पुरस्कार सोहळ्यात एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंगचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आरआरआर चित्रपटाची टीम जल्लोषात होती. पण ऑस्कर सोहळ्यासाठी जागा आरक्षित करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने किती खर्च केला हे तुम्हाला माहिती आहे का? आणि त्याचा खर्च आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केला होता.

इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार, एस.एस. राजामौली यांनी ऑस्कर २०२३ मध्ये प्रत्येक सीटसाठी २० लाख रुपये खर्च केले होते. नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एमएम कीरवाणी असले तरी, गीतकार चंद्र बोस आणि त्यांच्या पत्नींना २०२३ च्या ऑस्करमध्ये फ्री एंट्री होती. अकादमी पुरस्कारांनुसार ज्यांना पुरस्कार दिले जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांना फ्री एंट्री असते. याशिवाय, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतर कोणाला सहभागी व्हायचे असेल, तर त्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागतो.

एस.एस. राजामौली यांनी ‘आरआरआर’ चित्रपटाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्वतःसाठी आणि त्यांच्या टीममधील इतर सदस्यांसाठी तिकिटे देखील खरेदी केली होती. ऑस्कर २०२३ साठी तिकीटाची किंमत प्रति व्यक्ती $२५,००० होती, जी भारतीय रुपयात २०.६ लाख रुपये इतकी होते. विशेष म्हणजे एस.एस. राजामौली त्यांच्या पत्नी रमा राजामौली, मुलगा कार्तिकेय आणि सून यांच्यासह या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी झाले होते. चित्रपटाचे मुख्य अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर देखील त्यांच्या पत्नींसह शोमध्ये उपस्थित होते.