RRR ने दाखवला पुन्हा एकदा जलवा; ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचा सध्या जगभरात डंका पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ पुरस्कार पटकावला. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटाच्या टीमसोबतच भारतीय प्रेक्षक देखील आनंदी झाले. अशातच या चित्रपटाने आणखी एक पुरस्कार मिळवल्याची बातमी समोर येत आहे. या बातमीने भारतीयांचा आनंद दुप्पट झाला असून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुत केलं जात आहे.

RRR चा पुन्हा एकदा जलवा

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ चित्रपटानंतर ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ या पुरस्कारासाठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार फक्त चित्रपटाच्या टीमसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. क्रिटिक्स चॉइस अवॉर्डच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवरुन या पुरस्काराबाबत माहिती शेअर करण्यात आली असून एसएस राजामौली यांचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राजामौली हातात ट्रॉफी घेऊन उभे असलेले दिसत आहेत.

या श्रेणीमध्ये RRR चित्रपटासोबत ‘ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट’, ‘अर्जेंटीना 1985’, ‘बार्डो’, ‘फॉल्स क्रॉनिकल ऑफ ए हँडफुल ऑफ ट्रुथ्स’, ‘क्लोज’ आणि ‘डिसीजन टू लीव’ यांसारख्ये चित्रपट नामांकित होते.

‘नाटू नाटू’ गाण्याने मिळवला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’

नुकत्याच काही दिवसांपूर्वी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ पुरस्कार पटकावला. ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यासोबतच ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ मधील ‘नथिंग इज लॉस्ट’, ‘ब्लँक पँथर: वकंडा फॉरएवर’ मधील ‘लिफ्ट मी अप’, ‘टॉप गन: मेवरिक’ मधील ‘होल्ड माय हँड’ यांसारख्या विविध 83 ट्यून्यसमधील 15 गाण्यांचा नामांकन म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यातून ‘नाटू नाटू’ या गाण्याची सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात निवड करण्यात आली आहे.


हेही वाचा :

“अहो पाव्हनं …” लावणीच्या निमित्ताने मेघा घाडगे, संजय खापरे एकत्र