‘Khatron Ke Khiladi 12’ मध्ये Rubina Dilaik पासून Jannat Zubair पर्यंत ‘या’ स्पर्धकाचा असणार सहभाग

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा प्रसिद्ध रियालिटी शो ‘खतरो के खिलाडी 12’ लवकरच सुरू होणार आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या रियालिटी शोची आतुरतेने वाट पाहत होते. नुकत्याच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्थांकाची नावं समोर आली आहेत. अमेरिकेचा ‘फियर फॅक्टर’ या रियालिटी शोवर आधारित असलेल्या ‘खतरो के खिलाडी’ रियालिटी शोमध्ये अभिनेत्यांसह अनेक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना सहभागी केले जाते. यावेळीच्या ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये रुबीना दिलैक, जन्नत जुबैर, प्रतीक सहजपाल, शिवांगी जोशी, मुनव्वर फारूकी आणि राजीव अदातिया यांसारखे प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. खतरो के खिलाडीच्या नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात ‘खतरो के खिलाडी 12’ च्या स्पर्धकांचे फोटो समोर आले आहेत.

रुबीना दिलैक (Rubina Dilaik)
हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील अभिनेत्री , ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबीना दिलैक सुद्धा ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये सहभागी होणार आहे.

प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal)
‘बिग बॉस 15’ फेम प्रतीक सहजपाल ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये अॅक्शन करताना दिसणार आहे.

मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui)
स्टँड अप कॅमेडियन आणि ‘लॉक अप’ विजेता आता ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.

सृति झा (Sriti Jha)
‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री सृति झा सुद्धा ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये सहभागी होणार आहे. सृति झा ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये स्टंड करताना दिसणार आहे.

शिवांगी जोशी (Shivangi Joshi)
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशी ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये जबरदस्त स्टंड करण्यासाठी सज्ज झाली आहे.

अनेरी वजानी (Aneri Vajani)
हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री अनेरी वजानी सुद्धा ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

जन्नत झुबेर (Jannat Zubair)
अभिनेत्री जन्नत झुबेर सुद्धा ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

याशिवाय ‘खतरो के खिलाडी 12’ मध्ये स्पर्धक म्हणून तुषार कालिया , चेतना पांडे , राजीव अदातिया हे सुद्धा सहभागी होणार आहेत.


हेही वाचा :‘Kabhi Eid Kabhi Diwali’ मध्ये Shehnaaz Gill करणार ‘या’ अभिनेत्या सोबत रोमांस