घरमनोरंजन'या' तीन गोष्टींमुळे रूचाचा वाढदिवस ठरणार खास

‘या’ तीन गोष्टींमुळे रूचाचा वाढदिवस ठरणार खास

Subscribe

‘५ एप्रिलला रूचाचा वाढदिवस असतो.  यावर्षीचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच वेगळा असणार आहे.

डॉ सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये अभिनेत्री ऋचा इनामदार ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यंदाचा एप्रिल महिना तिच्यासाठी खूपच स्पेशल असणार आहे. ‘५ एप्रिलला रूचाचा वाढदिवस असतो.  यावर्षीचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच वेगळा असणार आहे.

कारण तीन धमाल गोष्टी यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहेत. रूचाची ‘क्रिमिनल जस्टीस’ नावाची वेबसिरीज आहे. ही वेब सिरीज बीबीसी आणि अप्लोस यांनी तयार केली आह. तिग्मांशू धुलिया यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शिन केलं आहे. सिरीयस थ्रिलर, ड्रामा स्पेस आणि  चांगला आशय असलेली ही वेबसिरीज आहे. ५ एप्रिलपासून तिचे एपिसोड हॉटस्टार स्पेशलमध्ये दाखवायला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

 दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता शाहरूख खानबरोबर रूचाने दोन जाहीरांतींमध्ये काम केलं आहे. या दोन जाहिराती याच सुमारास दाखविण्यास सुरुवात होणार आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा ‘वेडिंगचा शिनेमा’ हा आगामी चित्रपट. या चित्रपटात परी आणि पक्याच्या लग्नाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये असणारी परी म्हणजे रूचा. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे वाढदिवसांच खूप खास गिफ्ट रूचाला या निमित्ताने मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

Happy faces!!! #weddingchashinema #muktabarve #saleelkulkarni #dubbing

A post shared by Rucha Inamdar (@ruchainamdar) on

 मुंबईला डॉक्टरीचे शिक्षण घेतलेली परी सासवडला मोबाईल शॉप असेल्याला पक्याच्या प्रेमात पडते आणि या दोघांचं लग्न ठरल्यावर प्री वेडिंग फिल्म करावी अशी परीची इच्छा असते ! या फिल्म शूट करण्याच्या प्रवासामध्ये परी, प्रकाश आणि ही प्री वेडिंग फिल्म बनवणारी दिग्दर्शिका उर्वी (मुक्ता बर्वे) या तिघांच्या आपापल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनात काय बदल होतो त्याचबरोबर लग्न ठरण आणि ते संपन्न होण्याच्या प्रवासामध्ये आणखी काय गंमत जमत होते, यासाठी तुम्हाला ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट बघावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -