आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली संजना म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले सध्या चर्चेत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने साकारलेलं संजना नावाचं पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. या मालिकेमुळे संजनाला प्रसिद्धी तर मिळालीच सोबतच वैभव सुद्धा मिळाले. ज्याचा वापर ती आपल्या कुटुंबीयांच्या सुखासाठी करत आहे. काही महिन्यांपूर्वी रूपालीने स्वतःच हक्काचं घर घेतलं होतं. रुपालीने पुन्हा एकदा आलिशान गाडी खरेदी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर रुपालीने आलिशान गाडी घेतली. या गाडीला दोन महिने पूर्ण होताच तिने आणखी एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. ही आनंदी बातमी तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे जाहीर केली आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेने मर्सिडीज बेंझ ही गाडी खरेदी केली आहे. या नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत तिने सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिले आहे की, एक दिवस मी तुझी मालकीण होईन. ते आज यासाठी हे सर्व सुरू झालं. तुम्ही आयुष्यात फक्त स्वप्न पाहू नका तर ती स्वप्न जगा त्या स्वप्नांवर प्रेम करा आणि जोखीम उचला. कितीही कठीण असलं तरी स्वतःला वचन द्या अन तुम्ही तुमची स्वप्न सोडू नका. तुम्ही काय करू शकत नाही हे स्वतःला सांगू नका तर तुम्ही काय करू शकता हे सांगा. वेलकम बेबी… चल आता एकत्र पुढे प्रगती करत जाऊ… राधे राधे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये, रुपाली आपल्या कुटुंबियांबरोबर नव्या गाडीचं स्वागत करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री गाडीची पूजा करताना आणि केक कापताना दिसत आहे. या खास क्षणासाठी शोरुम रुपालीच्या फोटोंनी आणि फुग्यांनी सजवलेलं पाहायला मिळत आहे. ‘कारवाले डॉटकॉम’च्या मते रुपालीने खरेदी केलेल्या मर्सिडीज बेंझची किंमत ५० लाखांहून अधिक आहे.