happy birthday pancham da: एस. डी. आणि आर. डी. यांचा मजेशीर किस्सा, वडिलांवरच केला गाण्याची चाल चोरल्याचा आरोप

...आणि म्हणूनच आर. डी. यांनी त्यांचा वडिलांवर म्हणजेच एस. डी. यांच्यावर गाण्याची चाल चोरी केल्याचा आरोप केला.

संगीत क्षेत्रामधील एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे आर. डी. बर्मन.(R. D. Burman) ‘पंचम दा’ अशी ओळख असलेले आर. डी यांनी त्यांच्या गाण्यांमधून बॉलिवूडला एक क्लासिक लुक दिला आहे. हिंदी चित्रपटांची गाणी आर. डी यांच्या संगीताने एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहेत. पंचम यांनी संगीतामध्ये नेहेमीच विविध प्रयोग केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. आर. डी. यांची गाणी आजही तेवढीच ताजी वाटतात. संगीत प्रेमींना आजही आर. डी. यांची तेवढाच आनंद देतात.
आर. डी. बर्मन उर्फ राहुल देव बर्मन यांनी आपल्या गाण्यानी संगीत क्षेत्रामध्ये स्वतःची वगेळी ओळख निर्माण केली आहे. आर. डी. यांनी ३०० पेक्षा जास्त गाण्यांना संगीत दिलं आहे. आर. डी. म्हणजे एक दिलखुलास व्यक्तीमत्व आणि आज आर. डी. बर्मन यांची जयंती आहे. २७ जून १९३९ रोजी आर. डी. यांचा जन्म झाला. त्यांना बालपणापासूनच संगीताचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे वडील एस. डी. बर्मन (S. D. Burman) हे सुद्धा सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते. आर. डी. बर्मन यांनी वयाच्या ९ व्या वर्षी स्वतःच्याच वडिलांवर गाण्याची चाल चोरल्याचा आरोप केला होता. संगीतकार वडील – मुलाचा हाच मजेशीर किस्सा जाणून घेऊया…

 

हे ही वाचा –  वारीत सहभागी होऊन अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

आर. डी. बर्मन(R. D. Burman) जेव्हा ९ वर्षांचे होते तेव्हा ते त्यांच्या वडिलांपासून दूर कलकत्यायामध्ये राहून शिक्षण घेत होते. त्यावेळी एस. डी बर्मन (S. D. Burman) हे मुंबईत होते. आर. डी. यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांचे लक्ष शिक्षणापेक्षा संगीतात जास्त होते. आर. डी. यांना परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून एस. डी. बर्मन यांनी त्यांना खूप सुनावले. पण तेव्हा आर. डी. म्हणाले की मला शिक्षणाची नाही तर संगीत क्षेत्राची जास्त आवड आहे. हे ऐकून एस. डी. यांनी आर. डी. यांना गाण्याची एक चाल ऐकव असं संगितलं. त्यांनतर आर. डी. यांनी सुद्धा एक चाल ऐकवली. ती गाण्याची चाल ऐकून एस. डी (S. D. Burman) मुंबईत आले. त्या नांतर काही दिवसांनी कोलकाता येथे ‘फंटूस’ चित्रपट प्रदर्शित झाला. आर. डी. यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजेच एस. डी. यांना जी चाल ऐकवली होती त्याच चालीचा वापर ‘फंटूस’ या चित्रपटामध्ये करण्यात आला होता. ते ऐकून आर. डी. बर्मन(R. D. Burman) यांना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं आणि म्हणूनच आर. डी. यांनी त्यांचा वडिलांवर म्हणजेच एस. डी. यांच्यावर गाण्याची चाल चोरी केल्याचा आरोप केला. त्यावर एस. डी. बर्मन म्हणाले, की लोकांना ही चाल आवडते की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी या संगीताचा वापर केला. एस. डी. यांचं हे उत्तर ऐकून आर. डी. थक्क झाले.

हे ही वाचा –  अरूंधती सोडणार ‘आई कुठे काय करते’ मालिका? सोशल मीडियावर चर्चा सुरू

आर. डी. बर्मन(R. D. Burman) यांनी संगीत दिलेली सगळीच गाणी ही नेहमीच चिरतरुण आहेत. त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना नेहमीच मनमुराद आनंद दिला आहे. तिसरी मंजिल , पडोसन(padosan), आंधी(andhi), सत्ते पे सत्ता(satte pe satta), प्यार का मौसम, सागर, कटी पतंग, या आणि अश्या अनेक चित्रपटांसाठी आर. डी. बर्मन यांनी संगीत दिलं. चित्रपट सृष्टीमधील आणि संगीत सृष्ष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर आजही आर. डी. यांच्या आठवणींना उजाळा देतात. आर. डी. बर्मन हे त्यांच्या गाण्यांमधून नेहमीच संगीत प्रेमींच्या हृदयात असतील.