घरमनोरंजन‘भाकरवडी’ मराठी गुजराती मिलाफ

‘भाकरवडी’ मराठी गुजराती मिलाफ

Subscribe

‘भाकरवडी’च्या निमित्ताने पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवताना गुजराती कुटुंबाचाही यात समावेश केलेला आहे.

शनिवारवाडा, सारसबाग यामुळे पुणे हे शहर ओळखले जात असले तरी खवय्यांसाठी पुणे अधिक लक्षात राहण्याला कारण म्हणजे तिथली स्वादिष्ट, रुचकर भाकरवडी हे आहे. सोनी सब टी व्ही या वाहिनीने याच भाकरवडीला मालिकेचे शिर्षक देऊन विनोदी पद्धतीने मालिका सादर करण्याचे ठरवलेले आहे.

‘भाकरवडी’च्या निमित्ताने पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवताना गुजराती कुटुंबाचाही यात समावेश केलेला आहे. अर्थात दोन भिन्न संस्कृतीची कुटुंब एकत्र येतात तेव्हा वाद-विवाद झाल्याशिवाय रहात नाही. या वाद-विवादातली गंमत म्हणजेच ‘भाकरवडी’ ही मालिका सांगता येईल जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

सब टी व्ही पाहणार्‍या प्रेक्षकांना जेडी मजेठिया, आतिष कपाडीया हे नाव तसे नवीन नाही. खिचडी, बा, बहु और बेबी, साराभाई वर्सेस साराभाई या मालिकांची निर्मिती या दोघांनी केलेली आहे. ‘भाकरवडी’ ही त्यांचीच मालिका आहे. या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विनोदी अभिनेता म्हणून ज्याचा नावलौकीक आहे तो देवेन भोजनानी या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. परेश गणात्रा हा प्रतिभावान कलाकारसुद्धा त्याच्या सोबत असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -