बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात अभिनेत्यावर चाकूने वार करण्यात आले होते. जखमी अभिनेत्यावर रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. यानंतर अवघ्या 5 दिवसांत अभिनेता ठणठणीत असल्यासारखा सुखरूप घरी परतला. त्याच्या घरवापसीचा आनंद कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी साजरा केला. तर दुसरीकडे काहींनी अभिनेत्याच्या फास्ट रिकव्हरीबाबत वारंवार शंका उपस्थित केली. ज्यात काही राजकीय नेत्यांचादेखील समावेश आहे. यानंतर डॉक्टरांनी अभिनेत्याच्या फास्ट रिकव्हरीबाबत स्पष्टीकरण देऊनही सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरूच आहे. अखेर सैफची बहीण सबा पतौडीने आता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलंय. (Saba Pataudi replied trollers for trolling saif on his fast recovery)
सबाचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा पतौडी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे भावाला ट्रोल करणाऱ्यांसाठी तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तिने लिहिलंय, ‘आधी स्वतःला शिक्षित करा. सैफची रिकव्हरी फास्ट होतेय म्हणणाऱ्यांसाठी डॉक्टरने आधीच स्पष्टीकरण दिले आहे’. सबाने ‘द फिल्मी ऑफिशियल’ची पोस्ट शेअर केली आहे. तिने नेटकऱ्यांना ही इमेज पूर्ण ओपन करून कॅप्शन वाचा, असे सांगितले आहे.
सैफच्या फास्ट रिकव्हरीचे कारण काय?
सबा पतौडीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘चाकूच्या हल्ल्यानंतर सर्जरी होऊनही सैफ अली खान 5 दिवसात बरा कसा झाला? ही शंका कार्डिओलॉजिस्ट डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी खोडून काढली आहे. डॉ. दीपक यांनी स्पाईन सर्जरीनंतर त्यांच्या 78 वर्षीय आईचा चालतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, ज्या लोकांची कार्डियाक बायपास सर्जरी झाली आहे ते तिसऱ्या- चौथ्या दिवशी पायऱ्या चढू शकतात. स्वतःला शिक्षित करा’.
View this post on Instagram
सैफ अली खान हल्ला प्रकरण
दिनांक 16 जानेवारी २०२५ रोजी अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोर शिरला होता. ज्याच्यासोबत अभिनेत्याची झटापट झाली आणि यात हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्याच्या पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. उपचारार्थ त्याला लीलावती रुग्णालयात ५ दिवस भरती करण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर ६ तास सर्जरी देखील झाली. हल्ल्यानंतर ५ दिवसांनी अभिनेता रुग्णालयातून घरी परतला. सध्या त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच हल्लेखोराला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तो बांगलादेशी असल्याचे सांगितले जात आहे.
हेही पहा –