Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनSachin Pilgaonkar : माझ्याकडे काम नाही, सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केली मनातली खदखद

Sachin Pilgaonkar : माझ्याकडे काम नाही, सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केली मनातली खदखद

Subscribe

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आजवर अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी साकारलेल्या कित्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट ते बॉलिवूड सिनेमे आणि सिरीजमध्ये त्यांनी काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली. असे असूनही त्यांना कोणी सिनेमासाठी साइन करत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Sachin Pilgaonkar expressed his grief about not getting work in cine industry)

कोणी काम देत नाही

अभिनयक्षेत्रासह निर्मिती, दिग्दर्शन आणि गायन क्षेत्रातही सचिन पिळगांवकर यांनी नाव कमावलं आहे. अलीकडेच त्यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ सुपरहिट सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित झाला. तब्बल 20 वर्षांनी ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. यानंतर सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच ‘देवाचे घर’ सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली. तेव्हा एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, ‘मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी आता माझ्याकडे सध्यातरी कोणते काम नाही आणि मुख्य म्हणजे मला इंडस्ट्रीत कुणी काम देतही नाही. आमच्या सिनेमात काम करा असे म्हणायला माझ्याकडे कोणी येत नाही. ते का येत नाहीत हे मला माहिती नाही. त्यांना कदाचित वाटत असेल की मी एक्टिंग सोडली आहे, तर ती चुकीची समजूत आहे’.

चतुरस्त्र अभिनेता सचिन पिळगांवकर

‘हा माझा मार्ग एकला’ या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून सचिन पिळगांवकर यांनी अभिनयाला सुरुवात केली. ‘बालिका बधू’, ‘आंखियों के झारोखों से’ आणि ‘नदिया के पार’ या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम केल्यानंतर ते घराघरांत प्रसिद्ध झाले. हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमातदेखील त्यांनी काम केले आहे. अशाप्रकारे सिनेइंडस्ट्रीमध्ये त्यांनी 50 वर्ष पूर्ण केली आहेत. हा प्रवास त्यांनी ‘हाच माझा मार्ग’ नावाच्या पुस्तकातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही पहा –

Allu Arjun : मी बॉलिवूड शब्दाचा चाहता नाही, असं का म्हणाला अल्लू अर्जुन?