मराठी कलासृष्टीतील बरेच दिग्दर्शक नव्या आशयाच्या आणि विषयाच्या चित्रपटाची निर्मिती करू लागले आहेत. त्यामुळे हळूहळू मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस येताना दिसत आहेत. जो प्रेक्षक कधी काळी सर्वाधिक हिंदी सिनेमांसाठी थिएटरची पायरी चढायचा तोच प्रेक्षक वर्ग आज मराठी चित्रपटांसाठी वेळात वेळ काढून थिएटरमध्ये जाताना दिसतो. अशा प्रेक्षकांसाठी आता आणखी एक वेगळ्या संकल्पनेचा चित्रपट येऊ घातला आहे. ज्याचं नाव आहे ‘स्थळ’. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. (Sachin Pilgaonkar Presented Sthal Movie Teaser Released)
सचिन पिळगांवकरची उत्साही घोषणा
अरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची गोष्ट असलेल्या ‘स्थळ’ या चित्रपटाचा मनोरंजक टीजर रिलीज झाला आहे. या टीझर रिलीजआधी प्रसिद्ध अभिनेते आणि या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्याच्या माध्यमातून त्यांनी ‘स्थळ’ चित्रपटाचा टीझर उद्या येत असल्याची माहिती दिली होती.
View this post on Instagram
त्यांच्या या उत्साही घोषणेमुळे टीझर आणि एकूणच चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली. त्यानंतर टिझर रिलीज झाला आणि प्रेक्षकांना हे समजून चुकले की या चित्रपटातून रोजसारखी गोष्ट दाखवली जाणार नाही. तर अत्यंत अनोख्या कथानकासह हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पहा, असे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.
विषय जुनाच, पण नव्या पद्धतीने हाताळलेला
आपण सारेच जाणतो की, लग्न ठरवायचं असेल तर मुलगा आणि मुलगी समोरा समोर बसतात. मुलगा आणि त्याच्या घरचे मुलीला वेगवेगळे प्रश्न विचारतात. मुलगी मान खाली घालून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. आपलं काही चुकू नये यासाठी तिची धडपड सुरु असते. पण इथे जरा वेगळं आहे.
View this post on Instagram
हा टिझर पाहिल्यावर समजतं की, यामध्ये मुलीऐवजी मुलाला प्रश्न विचारले जात आहेत. यावेळी त्याची उडालेली भांबेरी पाहून कितीतरी मुलींची मन सुखावली असतील, यात शंका नाही. हा चित्रपट पूर्णपणे अरेंज्ड मॅरेज अर्थात एखादं स्थळ पाहून लग्न होणे, या विषयावर बेतला आहे. मात्र, तोचतोचपणा टाळून एका मनोरंजक पद्धतीने या चित्रपटाच्या कथानकाची हाताळणी करण्यात आल्याचं टीझरवरून समजतं.
चित्रपटाने जिंकले 16 पेक्षा जास्त पुरस्कार
जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी स्थळ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे.
माहितीनुसार, प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह तब्बल 29 महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत या चित्रपटाने 16 पेक्षा जास्त पुरस्कार पटकावले आहेत.
हेही पहा –