सडक २ म्हणजे डोक्याला ताप; नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सडक २

दिग्दर्शक – निर्माता महेश भट्ट यांचा सडक २ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शिक करण्यात आला होता. या चित्रपटाला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट आपापल्या रिस्क बघावा, असे समीक्षकांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर सडक २ ची खिल्ली उडवणारे भन्नाट पोस्टदेखील पाहायला मिळत आहेत. सडक २ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतरही याला सर्वाधिक डिसलाईक्स मिळाले होते. प्रेक्षकांनी सुरूवातीपासूनच या चित्रपटाला नापसंती दर्शवली आहे. आता तर संपूर्ण चित्रपट नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

सडक २ चित्रपटात संजय दत्त, पुजा भट्ट, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे कलाकार आहेत. हा सडक चित्रपटाचा पुढील भाग असून पहिल्या चित्रपटाच्या तब्बत २७ वर्षांनी हा बनवण्यात आला आहे. या चित्रपटाला नापसंती दर्शवण्याचे आणखी एक कारण म्हणजे सध्या सुरू असलेली बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची केस. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांना कथिक आरोपी म्हटले गेले आहे. त्यामुळे महेश भट्ट यांच्या तसेच नेपोटिझमच्या विरोधात स्टार किड्सच्या चित्रपटांनाही बॉयकॉट करण्याची मागणी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळेही सडक २ ला नापसंती दर्शवणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

हेही वाचा – 

कोरोना Act of God, तर तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड का? आजी-माजी अर्थमंत्री भिडले!