घरमनोरंजनSadak 2 Trailer : पहिल्या ६ तासांत १४ लाख viewers ने दर्शवली...

Sadak 2 Trailer : पहिल्या ६ तासांत १४ लाख viewers ने दर्शवली नापसंती

Subscribe

हिंदी चित्रपटातील आणखी एका सिनेमाचा भाग २ होत असून त्याचे ट्रेलर आज प्रदर्शित झाले आहे. तब्बल २७ वर्षांपूर्वी बनलेल्या सडक चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सडक २ चित्रपटाचे ट्रेलर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट, सिद्धार्थ रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरचा मात्र अवघ्या ६ तासात १४ लाख लोकांनी नापसंती दिर्शवली आहे. चित्रपटाचे ट्रेलर यु ट्यूबवर पाहता येत असून त्याच्या असलेल्या लाईक आणि डिसलाईक पर्यायापैकी १०० लाईक तर १.४ मिलियन म्हणजेच १४ लाख डिसलाईक आतापर्यंत मिळाले आहेत. त्यामुळे सडक २ ची पहिली झलक पाहून प्रेक्षकांनी त्याला नापसंती दर्शवल्याचे यातून समजते.

सकड २

दिग्दर्शक महेश भट्ट यांचा सडक चित्रपट २७ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. संजय दत्त, पूजा भट्ट, दिपक तिजोरी आणि महाराणीच्या भूमिकेत सदाशिव अमरापूरकर या कलाकारांनी त्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. आता पुन्हा एकदा सडक २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतू प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरला नापसंती दर्शवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी पोलीस, ईडी, सीबीआय तपास सुरू आहे. त्यातील कथित मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती हिच्यासोबत दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावरही चौकशीचा फेरा होता. दरम्यान, सुशांतला मानसिक रूग्ण बनवण्यासाठी हे दोघे कारणीभूत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलले जात होते. त्यामुळे की काय प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -