‘चक दे इंडिया’ सिनेमामुळे ओळख मिळालेली सागरिका घाटगे ही प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी आहे. सागरिका मुळची कोल्हापूरची. कोल्हापूरमध्ये 8 जानेवारी 1986 मध्ये राजघराण्यात सागरिकाचा जन्म झाला. विशेष म्हणजे सागरिका शाहू महाराजांच्या घराण्यातील आहे तर सागरिकाची आजी सीता राजे घाटगे ह्या इंदोरचे राजे तुकोजीराव होळकर यांची मुलगी. सागरिकाचे बालपण कोल्हापूरमध्ये गेले तर शिक्षण तिने अजमेर येथुन केले.
अभिनयाची सुरूवात
घरातील वातावरणामुळे सागरिका अभिनयाकडे वळली. घारे डोळे, वर्ण गोरा, देखणं रूप लाभलेली सागरिका दिसायला खूपच सूंदर आहे. त्यामुळे शाळेत असल्यापासून सागरिकाला मॉडलिंग आणि सिनेमाच्या ऑफर मिळत होत्या.
उत्तम हॉकीपटू
सागरिका अभ्यासात हूशार तर होतीच शिवाय खेळातही अव्वल आहे. सागरिका उत्तम हॉकीपटू असून तिने राष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला आहे. आजतागायत तिला अनेक बक्षिसे देखील मिळाली आहेत. सागरिकाच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास सागरिकाच्या पहिल्यांदा ‘चक दे इंडिया’ या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात तिने हॉकीपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर तिने अनेक कामे केली. जसे की, ‘मिले ना मिले हम’, ‘दिल दारिया’. सतीश राजवाडे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी सिनेमातही सागरिका झळकली होती. याशिवाय ‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम फेरीपर्यत मजल मारली होती. केवळ मराठी, हिंदीच नव्हे तर सागरिका पंजाबी सिनेमांमध्ये काम करते.
क्रिकेटपटूशी लग्न
सागरिकाने 2017 साली क्रिकेटर झहीर खानशी लग्नगाठ बांधली. त्यांचे रिलेशन गुप्त ठेवून साखरपुड्याचे फोटो शेअर करत सागरिका आणि झहीरने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. सागरिका आणि झहीर खान पहिल्यांदा एका पार्टीत भेटले आणि तेव्हा पाहताच क्षणी झहीरला सागरिका आवडली होती. ओळख झाल्यानंतर काही दिवसांतच ते एकमेकांना डेट करू लागले. पण, आपल्या लग्नात अडचणी येणार हे दोघांनाही माहित होते. कारण सागरिका हिंदू तर झहीर मुस्लिम आहे. झहीरने सागरिकाचा ‘चक दे इंडिया’ चित्रपट दाखवत घरच्यांना लग्नासाठी मनविले तर झहीरचे अस्खलित मराठी ऐकून सागरिकाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. अखेर 2017 साली दोघांनी लग्नगाठ बांधली.
सागरिका आहे बिझनेसवुमन –
सागरिकाने ‘अकुती’ नावाचा तिचा फॅशन ब्रॅंड लॉंच केला आहे. अकृती मध्ये पारंपारिक साड्यांना वेस्टर्न टच दिला जातो आणि हा ब्रॅंड बराच प्रचलित आहे. दरम्यान, सागरिका आता पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 2020 मध्ये आलेला ‘फूटपायरी’ नंतर आता तिचा ‘ललाट’ सिनेमा येणार आहे.
हेही पाहा –