Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Viral Video: सहदेवच्या आवाजात ऐका 'मनी हाइस्ट'मधील 'बेला चाओ' गाणं

Viral Video: सहदेवच्या आवाजात ऐका ‘मनी हाइस्ट’मधील ‘बेला चाओ’ गाणं

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘बसपन का प्यार’ व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. रातोरात स्टार झालेल्या सहदेवने ‘बसपन का प्यार’ गाणं गायलं होतं. त्यानंतर सहदेवसोबत बॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर-सिंगर बादशाहने हे गाणं पुन्हा गायलं. यादरम्यान आता सदहेवचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खास करून सहदेवचा हा व्हिडिओ नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘मनी हाइस्ट’च्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

सहदेवने या नव्या व्हिडिओत ‘बेला चाओ’ गाणं गायलं आहे. सहदेवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vatan Jaiswal (@vatan_jaiswal)

- Advertisement -

‘मनी हाइस्ट’चा पाचव्या सीझनचा पहिला पार्ट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे ‘मनी हाइस्ट’च्या पाचव्या सीझनची चर्चा सुरू आहे. पाचव्या सीझनचा दुसरा पार्ट तीन महिन्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मनी हाइस्ट’च्या या क्रेझदरम्यान सहदेवचा ‘बेला चाओ’ गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान बाहशाहसोबतचं सहदेवचं ‘बचपन का प्यार’ गाणं ११ ऑगस्टला प्रदर्शित झालं होत. अवघ्या दोन तासांत या गाण्याला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. या गाण्यामध्ये सहदेव बादशाहसोबत डान्स करताना दिसला. सहदेव आणि बादशाह व्यतिरिक्त या गाण्यात आस्था गिल आणि रिको देखील होता. या गाण्याचे बोल स्वतः बादशाहने लिहिलेत. बादशाहच्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित झालं होत आणि युट्यूबच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये देखील गाणं अॅड झालं होत.


- Advertisement -

हेही वाचा – रानू मंडलच्या आवाजात ‘बचपन का प्यार’ गाणं ऐकलं का? पाहा व्हायरल व्हिडिओ


 

- Advertisement -